मुंबई

अवजड वाहतुकीविरोधात नगरसेविकांचा एल्गार

CD

कळवा, ता. १० (बातमीदार) : कळव्यातील कोंडीवर सध्या वाहतूक विभागाचे नियंत्रण नसल्याने गणेशोत्सवापूर्वी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी कळव्यातील महिला नगरसेविकांनी पुढाकार घेतला आहे. वाढते अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कळव्यातील नगरसेविका प्रमिला केणी यांच्या नेतृत्वाखाली कळवा, खारेगावातील नगरसेविकांनी एकत्र येत ठाणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्तांना निवेदन देऊन ही अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी केली आहे.

खारेगाव आत्माराम चौक रेतीबंदर ते कळवा नाका या मार्गावर आठ चाकी, दहाचाकी व तत्सम अवजड वाहनांची सध्या मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढत असून, अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यात या परिसरात दोन अपघात झाले, तसेच सध्या गणेशोत्सवाचे दिवस असल्याने खरेदीसाठी नागरिकांची ठाणे, कळवा परिसरात गर्दी वाढत असल्याने मुंब्रा व भिवंडीमार्गे कळव्यातून जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे रोज सकाळी व संध्याकाळी कळवा नाका व परिसरात मोठ्या प्रमाणात कोंडी होते. त्यामुळे अपघातांचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आत्माराम चौक, रेतीबंदर, कळवा नाका या मार्गावर अवजड वाहनांना वाहतूक परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे. या वेळी नगरसेविका विजया लासे, प्रियांका पाटील, अपर्णा साळवी, आरती गायकवाड आदी उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT