मुंबई

लाडक्या गौराईच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या

CD

लाडक्या गौराईच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या
रेडीमेड मुखवट्यांना मोठी मागणी
नेरूळ, ता. १० (बातमीदार) ः गौरी-गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या गौराईच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. नवी मुंबईतील बाजारपेठांमध्ये गौरीच्या श्रृंगार व सजावटीच्या वस्तूंची मोठी रेलचेल पाहायला मिळत असून, यंदा आकर्षक आणि नक्षीकाम केलेल्या रेडीमेड मुखवट्यांना महिला वर्गाकडून मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.
पारंपरिक पद्धतीने गौराईची सजावट करण्यासाठी बाजारात साड्या, रेडीमेड मुखवटे, दागिने, हार, गजरे, फुलांची सजावट आणि पूजेच्या साहित्य दाखल झाले आहे. पारंपरिक रूपातील तसेच आकर्षक नक्षीकाम केलेले मुखवटे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या मुखवट्यांच्या किमती साधारण ५०० ते अडीच हजारांपर्यंत असून, अधिक आकर्षक आणि सजावटीच्या मुखवट्यांची किंमत तीन ते पाच हजारांपर्यंत आहे.

गौराईसाठी विविध साड्यांची खरेदी
गौराईच्या पारंपरिक सजावटीमध्ये साडीला विशेष महत्त्व असल्याने बाजारात विविध रंगांच्या आणि डिझाइनच्या साड्या उपलब्ध आहेत. पैठणी, नऊवारी, जरी बॉर्डर, रेशमी आणि आकर्षक प्रिंटच्या छोट्या आकारातील साड्यांना महिलांकडून पसंती मिळत आहे. या साड्यांची किंमत साधारण ३०० ते दीड हजारांपर्यंत असून, अधिक आकर्षक जरी व पैठणी डिझाइनच्या साड्या दोन ते साडेतीन हजारांपर्यंत उपलब्ध आहेत.

विविध दागिन्यांनी सजणार गौराई
गौराईच्या श्रृंगारासाठी हार, ठुशी, मोहनमाळ, बोरमाळ, मंगळसूत्र, नथ, कुडी, बांगड्या, बाजूबंद, कमरपट्टा तसेच मुकुट अशा विविध दागिन्यांचे संच विक्रीसाठी ठेवले आहेत. कृत्रिम दागिन्यांचे संच साधारण १५० ते ८०० दरम्यान उपलब्ध असून, अधिक आकर्षक व पूर्ण दागिन्यांचे सेट एक ते अडीच हजारांपर्यंत मिळत आहेत. गौराईच्या केसांच्या सजावटीसाठी कृत्रिम गजरे, वेण्या आणि फुलांचे हारही मोठ्या प्रमाणात बाजारात आले आहेत. त्यांची किंमत साधारण ५० ते ३०० दरम्यान आहे. याशिवाय मुकुट व इतर शृंगार साहित्य १०० ते ५०० पर्यंत उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Marathi News Live Updates : नेपाळमधील महाप्रलयात आतापर्यंत 1,377 जणांचा मृत्यू; 5,130 नागरिक अजूनही बेपत्ता

SCROLL FOR NEXT