मुंबई

फ्युजन स्वीट्स, शुगर-फ्री, व्हेगन मिठाईंना पसंती

CD

फ्युजन स्वीट्स, शुगर-फ्री, व्हेगन मिठाईंना पसंती
गौरी-गणपतीसाठी मोदक, लाडू, पेढ्यांसह विविध नैवेद्य प्रकार बाजारात
वाशी, ता. १० (बातमीदार) ः गणेशोत्सवाचे वेध लागल्याने घराघरांत सजावटीच्या तयारीसोबतच गौरी-गणपतीच्या नैवेद्यासाठी मिठाई आणि मोदकांच्या खरेदीला उधाण आले आहे. पारंपरिक उकडीचे मोदक, लाडू आणि पेढ्यांसोबतच यंदा बाजारात फ्युजन स्वीट्स, शुगर-फ्री, ग्लुटेन-फ्री आणि व्हेगन मिठाईला ग्राहकांकडून विशेष पसंती मिळत आहे.
गणेशोत्सवात उकडीचे मोदक सर्वाधिक लोकप्रिय असले तरी चॉकलेट मोदक, काजू मोदक, पिस्ता मोदक, नारळ-गुळाचे मोदक तसेच ड्रायफ्रूट मोदकांची मागणी वाढली आहे. गुलाब आणि केशर फ्लेवरचे उकडीचे मोदक तसेच सोन्याचा वर्ख लावलेले प्रीमियम मोदकही बाजारात उपलब्ध झाले आहेत. बेसन लाडू, रवा लाडू, नारळ लाडू आणि ड्रायफ्रूट लाडूंचे आकर्षक कॉम्बो पॅकही दुकानदारांनी उपलब्ध करून दिले आहेत.

फ्युजन फ्लेवर्स आणि चीज पेढ्यांची भुरळ
मिठाईच्या प्रकारांमध्ये लेमनग्रास, चेरी, कॉफी-मकाडेमिया, तिरामिसू, कॅरॅमल यांसारख्या फ्लेवरचा समावेश झाला आहे. तसेच ‘न्यूयॉर्क चीज पेढा’ आणि ‘जपानीज चीज पेढा’ यांसारखे नवीन प्रकारही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

पारंपरिक मोदक १,२५० रुपये
यंदा मिठाईच्या भावात साधारण १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ब्लूबेरी मोदक सुमारे १,६०० रुपये प्रतिकिलो, पारंपरिक मोदक १,२५० रुपये, तूप-खवा मिठाई १,२०० रुपये, तर ड्रायफ्रूट मिठाई सुमारे १,५०० रुपये प्रतिकिलो भावाने विकली जात आहे. गुलाब व केशर उकडीचे मोदक एक हजार रुपये प्रतिकिलोपासून उपलब्ध आहेत. मिठाई उत्पादक किसन कुमार यांनी सांगितले की, गणरायाच्या नैवेद्यासाठी यंदा मावा, उकडीचे आणि काजूचे मोदक तयार केले आहेत. मिठाईच्या भावात वाढ झाली असली तरी ग्राहकांचा उत्साह कायम असून, नवीन प्रकारांना चांगली मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Marathi News Live Updates : नेपाळमधील महाप्रलयात आतापर्यंत 1,377 जणांचा मृत्यू; 5,130 नागरिक अजूनही बेपत्ता

SCROLL FOR NEXT