इमारतीवरून उडी मारून
वृद्धाची आत्महत्या
घाटकोपर, ता. १० (बातमीदार) : पंतनगर येथील एका इमारतीच्या छतावरून उडी मारून ६१ वर्षीय वृद्धाने आत्महत्या केली. मनीष मनिलाल भयानी असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून ही घटना घडल्याची माहिती पंतनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक लता सुतार यांनी दिली.
पंतनगर पोलिस ठाणे हद्दीतील इमारत क्रमांक १४ सीमा राजधानी या इमारतीच्या टेरेसवरून या व्यक्तीने उडी मारून आत्महत्या केली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. भयानी हे बॉल बेअरिंगचा व्यवसाय करीत होते. ते अशोक सोळंकी यांना भेटण्यासाठी साेमवारी (ता. ७) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आले होते. साेळंकी यांचा मुलगा कृष्णा आणि भयानी यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीचे व्यवहार होते. कृष्णा हा वडिलांसाेबत एक वर्षापासून राहत नव्हता. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही तपासले असता सोळंकी यांना भेटल्यानंतर भयानी हे सकाळी १०.४५च्या सुमारास बाहेर पडल्याचे दिसले. तेव्हा त्यांच्यासाेबत साेळंकीही हाेते. त्यानंतर भयानी यांनी ११ वाजता पुन्हा इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर विसावा मजला गाठून छतावरून स्वत:ला झाेकून दिल्याचे सीसीटीव्हीतील चित्रीकरणातून दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.