मुंबई

आधी मोबदला, मगच मोजणी!

CD

शहापूर, ता. ११ (वार्ताहर) : खर्डी, वरस्कोळ, पिंपळपाडा आणि घाणेपाडा पंचक्रोशीतील औद्योगिक क्षेत्रासाठी जमीन अधिग्रहित होऊन आठ वर्षे उलटली, तरी ३४ बाधित शेतकरी कुटुंबांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी औद्योगिक क्षेत्राच्या अंतिम जमीन मोजणीला कडाडून विरोध केला. मोबदला देण्यापूर्वीच सातबारा उताऱ्यावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नावाची नोंद केल्याने पीक कर्जासह सरकारी लाभापासूनही वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे ‘आधी संपूर्ण मोबदला द्या, मगच मोजणी करा,’ अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
२०१९ मध्ये खर्डी पंचक्रोशीतील पाच गावांमध्ये औद्योगिक क्षेत्र विकासाची घोषणा करताना बाधित ३४ शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्या जमिनीचे संपादन केले होते. त्यानंतर सातबारा उताऱ्यावरील ‘इतर अधिकार’ या रकान्यात शेतकऱ्यांना कोणतीही सूचना न देता एमआयडीसीच्या नावाची नोंद करण्यात आली. त्यामुळे आठ वर्षांत शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे लाभ घेता आले नाही. मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी एमआयडीसीकडे वारंवार तक्रारी केल्या. दुसरीकडे, काही निवडक शेतकऱ्यांना मोबदला देऊन मोजणीचे काम सुरू केले आहे. यापूर्वीच बाधित शेतकऱ्यांनी निवेदन देऊन संपूर्ण मोबदला खात्यावर जमा होईपर्यंत मोजणी अथवा पुढील कोणतेही काम सुरू करू नये, अशी मागणी केली होती. मात्र, मागणीकडे दुर्लक्ष करून मोजणीचा प्रयत्न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला.
जोपर्यंत हक्काचा मोबदला मिळत नाही, तोपर्यंत मोजणी व अन्य कामे करू देणार नाही. प्रशासनाने ही कार्यवाही सुरू केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. तसेच प्रलंबित मोबदला तातडीने व्याजासह देण्याची मागणी त्यांनी केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास कदम यांनी शेतकऱ्यांची बैठक घेतली. मात्र, शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगण्यात आले.

मोजणी तूर्त स्थगित
दोन दिवसांत होणारी मोजणी प्रक्रिया स्थगित केल्याचे एमआयडीसीचे नीलेश ठाकरे यांनी जाहीर केले होते. मात्र, ९ सप्टेंबरला महामंडळाचे अधिकारी, पोलिस प्रशासन आणि मोजणी कर्मचारी एकत्र आल्याने शेतकऱ्यांनी मोजणीला जोरदार विरोध केला. शेतकऱ्यांचा संताप लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी वरिष्ठ आणि तहसीलदारांशी समन्वय साधला. त्यानंतर तूर्तास मोजणी स्थगित करण्यात आली. बाधित शेतकरी, तहसीलदार आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

SCROLL FOR NEXT