मुंबई

खड्ड्यांवरून सत्ताधारी नगरसेवकाचा ठिय्या

CD

अंबरनाथ, ता. ११ (वार्ताहर) : गणेशोत्सव काही दिवसांवर असतानाही शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही संथ असल्याने सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी बुधवारी पालिका प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत त्यांनी पालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या देत उपोषण सुरू केले. त्यानंतर कार्यालयात अनुपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्या थेट पुरुष स्वच्छतागृहात नेऊन ठेवल्याने पालिका कार्यालयात खळबळ उडाली.
शहरातील नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत अधिकाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप सोमेश्वर यांनी केला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्यांवर वर्दळ वाढणार आहे. अशा परिस्थितीत खड्डे कायम राहिल्यास अपघाताचा धोका निर्माण झाला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे, असे त्यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित करून ते तातडीने बुजविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र, सभेला काही दिवस उलटूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. सर्वसाधारण सभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाचा अधिकाऱ्यांना काही दिवसांतच विसर पडल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, आंदोलनादरम्यान काही अधिकारी कार्यालयात अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सोमेश्वर यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्या उचलून थेट पुरुष स्वच्छतागृहात नेऊन ठेवल्या. या अनोख्या आंदोलनामुळे पालिका कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

SCROLL FOR NEXT