गौतमी पाटीलसह आयोजकांवर गुन्हे दाखल करा
नगरसेविका मृणाल पेंडसे यांची मागणी; महिला आयोगाकडेही तक्रार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : दहीहंडी उत्सवाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी कथित अश्लील नृत्य सादर करण्यात आल्याच्या आरोपावरून ठाण्यात नवा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, कलाकार गौतमी पाटील आणि संबंधित आयोजकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी ठाणे पोलिस आयुक्तांकडे केली आहे. तसेच राज्य महिला आयोगाकडेही याची तक्रार करण्यात आली आहे.
दहीहंडी उत्सवातील मनोरंजनाच्या कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह स्वरूपाचे नृत्य सादर करण्यात आल्याचा दावा पेंडसे यांनी केला आहे. या कथित सादरीकरणाचा व्हिडिओही त्यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीसोबत जोडला आहे. त्यामुळे पोलिसांकडून या तक्रारीची दखल घेतली जाते का, याकडे लक्ष लागले आहे. अशा कार्यक्रमांना मनोरंजनाचे स्वरूप देताना त्यातील आशय आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम याचाही विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आयोजकांचीही जबाबदारी निश्चित करा
सार्वजनिक ठिकाणी कथित अश्लील सादरीकरणाला परवानगी देणाऱ्या आयोजकांचीही जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी पेंडसे यांनी केली आहे. केवळ कलाकारावर कारवाई न करता कार्यक्रमाचे आयोजन, परवानगी आणि सादरीकरणाच्या स्वरूपाचीही चौकशी करावी, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.