मुंबई

लंडनमध्ये होणार संविधानाच्या अमृतमहोत्सवाचा जागर

CD

मुंबई, ता. १० : भारतीय संविधानाच्या ७५व्या अमृत महोत्सवाचा जागर भारतानंतर आता प्रथमच परदेशातील लंडनच्या संसदेत होणार आहे. भारतासह देशविदेशातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बायोपिकसह विविध कार्यक्रमांचे आयोजन या वेळी करण्यात येणार असल्याची माहिती या कार्यक्रमाचे आयोजक बोधिसत्त्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अविनाश कांबळे व बीबीएमजी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ. गौरव हंस, लंडन (यूके) यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित परिषदेत दिली.

बीबीएमजी फाउंडेशन लंडन यूके आणि बोधिसत्व फाउंडेशन मुंबई भारत यांच्या संयुक्त विद्यमाने, बोधिसत्त्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला अर्पण केलेले भारतीय संविधान यांना नुकतेच ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत, त्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम लंडनमधील संसदेत घेण्यात येणार आहे. भारत, जपान, कंबोडिया थायलंड, लंडन, श्रीलंका, फ्रान्स, साऊथ कोरिया येथील मंत्री, खासदार, राजदूत तसेच उद्योगपती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर भारतामधून अनेक दिग्गज मान्यवर मंत्री, खासदार उपस्थित राहणार आहेत.

बोधिसत्त्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, त्यांची आंदोलने, त्यांचा वारसा आणि त्यांची दूरदृष्टी, ग्रंथसंपदा यांना समर्पित अशा एका महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन लंडन यूके येथे करण्यात येत आहे. याअंतर्गत लंडन आणि लीसेस्टर येथे विशेष नाट्यमय सादरीकरण करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT