मुंबई

घराच्या परिसरातच तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी!

CD

घराच्या परिसरातच तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी
पनवेल महापालिकेच्या वतीने ४३ ठिकाणी आरोग्य शिबिरे; फणसवाडीत शिबिराचे उद्‍घाटन
पनवेल ता. ११ (बातमीदार) : नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आणि तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पनवेल पालिकेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लोककल्याणकारी योजनेअंतर्गत विशेष आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले आहे. महापालिका क्षेत्रातील चारही प्रभागांमध्ये सुमारे ४३ ठिकाणी ही शिबिरे घेण्यात येणार असून, १० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
महापौर नितीन पाटील यांच्या सूचनेनुसार सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमातील शिबिराचे उद्‍घाटन फणसवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रभाग समिती बचे सभापती मधू पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घेतली. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरास मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, क्षयरोग अधिकारी डॉ. उषा राठोड, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. गणेश नायर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पंडित, डॉ. भक्तराज भोईटे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरांमध्ये स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, कान-नाक-घसा, भिषक, नेत्ररोग, अस्थिरोग, मानसोपचार, बालरोग आणि त्वचारोग या विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. प्राथमिक तपासणीनंतर आवश्यकतेनुसार पुढील उपचार व वैद्यकीय सल्लाही देण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा त्यांच्या परिसरातच उपलब्ध व्हावी, हा या आरोग्य शिबिरांचा प्रमुख उद्देश आहे. विविध आजारांचे वेळीच निदान होऊन योग्य उपचार मिळावेत यासाठी नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा. नियमित आरोग्य तपासणीमुळे आजारांचे गांभीर्य वाढण्यापूर्वीच त्यावर योग्य उपचार करणे शक्य होते.
- डॉ. आनंद गोसावी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पनवेल पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Crisis : भारतात पुन्हा एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवणार? इराण-अमेरिका युद्धामुळे वाढली चिंता, घरगुती गॅस महागणार?

Inspiring Story : शेतकऱ्याच्या मुलानं नाकारल्या तब्बल 11 सरकारी नोकऱ्या; आईचं स्वप्न पूर्ण करत अखेर बनला SDM, 12 व्या प्रयत्नात श्यामनं कसं मिळवलं यश?

Society Anandotsav Competition : गणेशोत्सवात सोसायटी सजवा अन् जिंका बंपर बक्षीस; रितेश-जेनेलियाला भेटण्याचीही संधी!

Latest Marathi News Live Update : उद्याच्या बैठकीसाठी आंतरवालीत या, मनोज जरागेंचं आंदोलकांना आवाहन

Success Story: 13 लाखांची ExxonMobilची कॉर्पोरेट नोकरी सोडून बनली आर्मी ऑफिसर! कोण आहेत NIT इंजिनीअर अथिरा सुरेश?

SCROLL FOR NEXT