मुंबई

गणरायाच्या आगमनाची आतुरता

CD

गणरायाच्या आगमनाची आतुरता
उरणची बाजारपेठ सजली; मूर्तिकारांची लगबग, खरेदीसाठी गर्दी वाढली
उरण, ता. ११ (बातमीदार) : गणेश चतुर्थी अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने उरण तालुक्यात गणेशोत्सवाची लगबग शिगेला पोहोचली आहे. यंदा १४ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार असल्याने घराघरांत साफसफाई, सजावट आणि पूजेच्या तयारीला वेग आला आहे. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, तालुक्यातील बाजारपेठाही विविध वस्तूंनी सजल्या आहेत.
गणेशमूर्ती, पूजेचे साहित्य, सजावटीच्या वस्तू, आकर्षक रोषणाई, फुले तसेच गणेशभक्तांच्या पसंतीचे कपडे खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ वाढली आहे. गणेश कलानगरात मूर्तिकारांकडून मूर्तींवर शेवटचा हात फिरविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भाविकांच्या मागणीनुसार विविध आकार, रंग आणि आकर्षक रूपातील गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.
मुंबई आणि कोकणात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडूनही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंडप उभारणी, विद्युत रोषणाई, सजावट तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा यासाठी पोलिस यंत्रणाही सज्ज झाली असून, सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आवश्यक सूचना दिल्या जात आहेत.

वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यावर महावितरणचा भर
गणेशोत्सवाच्या काळात घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी विद्युत रोषणाई मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे उत्सवाच्या काळात वीजपुरवठा सुरळीत राहावा आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महावितरणने विशेष खबरदारी घेतली आहे. उरण येथील अभियंता विकास गायकवाड यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. उत्सव काळात वीज यंत्रणेवर लक्ष ठेवून तातडीने समस्या सोडविण्याची तयारी महावितरणकडून करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Crisis : भारतात पुन्हा एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवणार? इराण-अमेरिका युद्धामुळे वाढली चिंता, घरगुती गॅस महागणार?

Kuldeep Yadav: एकाच सामन्यात १० विकेट्स... कुलदीपचा इंग्लंडमध्ये कहर! नोंदवली सर्वोत्तम कामगिरी

Inspiring Story : शेतकऱ्याच्या मुलानं नाकारल्या तब्बल 11 सरकारी नोकऱ्या; आईचं स्वप्न पूर्ण करत अखेर बनला SDM, 12 व्या प्रयत्नात श्यामनं कसं मिळवलं यश?

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Society Anandotsav Competition : गणेशोत्सवात सोसायटी सजवा अन् जिंका बंपर बक्षीस; रितेश-जेनेलियाला भेटण्याचीही संधी!

SCROLL FOR NEXT