मुंबई

समाजसेवेच्या दिशेने संतोष दळवी फाऊंडेशनचे पहिले पाऊल

CD

संतोष दळवी फाऊंडेशनचे उद्‍घाटनव उत्साहात
बेलापूर, ता. १० (बातमीदार) ः संतोष दळवी फाऊंडेशनचा उद्‍घाटन सोहळा शुक्रवारी (ता. ६) नेरुळ येथील तेरणा डेंटल कॉलेज ऑडिटोरियममध्ये उत्साहात पार पडला. समाज सशक्तीकरण, जनसेवा आणि सामाजिक विकासाला नवी दिशा देण्याच्या उद्देश यामागे असल्याचे संस्थापक संतोष दळवी यांनी सांगितले आहे.
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना मनात ठेवत संतोष दळवी फाउंडेशन भविष्यात कार्यरत राहणार आहे. शिक्षण, जनसेवा, गरजूंची मदत, आरोग्य, सामाजिक जनजागृती तसेच शाश्वत विकासाशी संबंधित विविध उपक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून राबवले जाणार आहेत. संतोष दळवी आणि स्वाती दळवी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या फाउंडेशनचा ‘मानवता हाच आमचा धर्म’ संदेश आहे.
फाउंडेशनच्या या पहिल्याच पावलाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आगामी काळात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

मला समाजातील तळागाळातील अडलेल्या नागरिकाला मदत करायची आहे. युवकांचे शिक्षण, रोजगार यासोबत नागरिकांच्या विविध समस्यांसाठी सुख दुःखात सोबत रहायचे आहे. यासाठी सर्व नियमांचे पालन करून फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे.
- संतोष दळवी, संस्थापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT