माणुसकीच्या भिंतीवर भंगारवाल्यांचा डल्ला
कपडे विक्रेते, भंगारवालेांकडून दानातील वस्तूंची परस्पर विल्हेवाट; पालिकेच्या योजनेवर प्रश्नचिन्ह
वाशी, ता. १३ (बातमीदार) : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवी मुंबई महापालिकेने ‘हवे असेल ते घ्या आणि नको असेल ते द्या’ या संकल्पनेतून गरजूंना मदत करण्यासाठी शहरात माणुसकीच्या भिंती उभारल्या आहेत. मात्र, या ठिकाणी नागरिकांनी दान केलेल्या वस्तूंवर कपडे विक्रेते आणि भंगारवाले डल्ला मारत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे गरजूंऐवजी इतरांकडून या योजनेचा गैरफायदा घेतला जात असल्याने दानशूर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शहरातील ६८ मोक्याच्या ठिकाणी १६ खणांची कपाटे ठेवण्यात आली आहेत. सुस्थितीतील कपडे, ब्लँकेट, खेळणी, सायकल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वैद्यकीय साहित्य आदी वस्तू नागरिक येथे दान करू शकतात. गरजू नागरिकांनी त्या मोफत घेऊन जाव्यात, हा योजनेचा उद्देश आहे.
दानातील वस्तूंची परस्पर विल्हेवाट
कपडे घेऊन भांडी देणारे विक्रेते दानातील कपडे उचलून नेत आहेत. तसेच प्लास्टिक, स्टील, पुस्तके, कागद व लोखंडी वस्तू भंगारवाले घेऊन जात आहेत. कचरा गोळा करणारेही दानातील साहित्य गोणीत भरून नेत असल्याने माणुसकीची भिंत गरजूंसाठी की भंगारवाल्यांसाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.