मुंबई

सत्य मांडण्यासाठी समाज माध्यमांवर सक्रिय व्हा

CD

सत्य मांडण्यासाठी समाजमाध्यमांवर सक्रिय व्हा
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन; उत्तर रायगड भाजपची विस्तृत कार्यकारिणी बैठक
पनवेल, ता. ११ (बातमीदार) : समाजमाध्यमांवर विरोधकांकडून अफवा, गैरसमज आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास भाजप कार्यकर्त्यांनी सत्य व वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी. कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर सक्रिय आणि ‘बोलके’ राहावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले.
उत्तर रायगड जिल्हा भाजपची विस्तृत कार्यकारिणी बैठक पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाली. या वेळी चव्हाण मार्गदर्शन करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. सरकारच्या विकासकामांची माहिती प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून सुरू असलेली विकासकामे नागरिकांपर्यंत पोहोचविल्यास संघटना अधिक मजबूत होऊन नवीन कार्यकर्ते पक्षाशी जोडले जातील, असेही चव्हाण यांनी सांगितले.
अमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्याचे आवाहन करताना उत्तर रायगड युवा मोर्चाच्या ‘युवा वॉरियर्स’ उपक्रमाच्या प्रोमो व टी-शर्टचे अनावरण करण्यात आले. उपस्थितांना ‘नशामुक्त भारत’ची शपथ देण्यात आली. आमदार निरंजन डावखरे यांनी एसआयआर प्रक्रियेबाबत, तर आमदार योगेश सागर यांनी ‘सेवा संकल्प अभियाना’बाबत माहिती दिली.

सेवा, संवाद आणि संघटनावर भर
१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. सेवा, संवाद आणि संघटन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून पक्षाचे काम अधिक व्यापक करण्याचे नियोजन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी प्रास्ताविक केले. बैठकीला पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मंडल अध्यक्ष व विविध आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Crisis : भारतात पुन्हा एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवणार? इराण-अमेरिका युद्धामुळे वाढली चिंता, घरगुती गॅस महागणार?

Inspiring Story : शेतकऱ्याच्या मुलानं नाकारल्या तब्बल 11 सरकारी नोकऱ्या; आईचं स्वप्न पूर्ण करत अखेर बनला SDM, 12 व्या प्रयत्नात श्यामनं कसं मिळवलं यश?

Society Anandotsav Competition : गणेशोत्सवात सोसायटी सजवा अन् जिंका बंपर बक्षीस; रितेश-जेनेलियाला भेटण्याचीही संधी!

Latest Marathi News Live Update : उद्याच्या बैठकीसाठी आंतरवालीत या, मनोज जरागेंचं आंदोलकांना आवाहन

Success Story: 13 लाखांची ExxonMobilची कॉर्पोरेट नोकरी सोडून बनली आर्मी ऑफिसर! कोण आहेत NIT इंजिनीअर अथिरा सुरेश?

SCROLL FOR NEXT