मुंबई

बंद घरांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : गणेशोत्सवासाठी कोकणातील मूळ गावी जाण्याची लगबग सुरू झाली असताना बंद घरांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. गणपती उत्सवाच्या काळात अनेक गणेशभक्त कुटुंबासह काही दिवसांसाठी गावी जाणार असल्याने अनेक घरे बंद राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर घरफोडी आणि चोरीच्या घटना टाळण्यासाठी मुंब्रा पोलिसांनी नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

दिव्यातील नागरिकांनी गावी जाण्यापूर्वी घरात सोन्याचे दागिने, मोठी रोकड किंवा अन्य मौल्यवान वस्तू ठेवू नयेत. शक्य असल्यास दागिने व महत्त्वाच्या वस्तू सुरक्षित ठिकाणी किंवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात, असे पोलिसांनी सांगितले आहे. घर बंद करताना मुख्य दरवाजासह खिडक्या, बाल्कनी आणि इतर प्रवेशद्वारे व्यवस्थित बंद करून कुलूप लावण्याची सूचना करण्यात आली आहे.

‘गावी गेलोय’ समाजमाध्यमांवर सांगू नका!
बाहेरगावी जाण्याची माहिती समाजमाध्यमांवर टाकणे टाळावे. घरातील व्यक्ती काही दिवसांसाठी बाहेर असल्याची माहिती सार्वजनिक झाल्यास त्याचा गैरफायदा चोरटे घेऊ शकतात. त्यामुळे प्रवासाचे फोटो किंवा घर बंद असल्याचे संकेत देणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करू नयेत. घराची चावी किंवा घराशी संबंधित संवेदनशील माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नये. परिसरात संशयास्पद व्यक्ती, वाहन किंवा हालचाल आढळल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असेही आवाहन मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश जवादवाड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

SCROLL FOR NEXT