मुंबई

मुंब्रा-कौसाचा श्वास फेरीवाल्यांनी कोंडला

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : मुंब्रा-कौसा परिसरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत असताना मुख्य रस्त्यांवर बेकायदा फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रस्त्याचा मोठा भाग हातगाड्या आणि फेरीवाल्यांनी व्यापल्याने वाहनांची कोंडी होत असून, त्याचा थेट फटका नागरिकांना बसत आहे. या फेरीवाल्यांच्या मागे कथित हप्तेवसुलीचे जाळे असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. त्यामुळे फेरीवाल्यांवर कारवाई करण्याबरोबरच त्यांना रस्त्यावर बसविणाऱ्या सूत्रधारांचा शोध घेऊन खंडणीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मुंब्रा ते कौसा या प्रमुख मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. नगरसेवक शाकिर शेख, सीमा दाते, समाजसेवक साकीब दाते, मैसर शेख आणि नाजीम बुबेरे यांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात निवेदन सादर केले. या भागात मोठ्या प्रमाणावर हातगाड्या लावल्या जात असून, त्यांची संख्या तब्बल दोन हजारापर्यंत असल्याचा दावा मर्जिया पठाण यांनी केला. या हातगाड्यांना कथितरीत्या शिफ्टनुसार हप्ते आकारले जात असल्याने रस्त्यावरील अतिक्रमणाला पाठबळ मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे केवळ फेरीवाल्यांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नसून, त्यामागील यंत्रणेपर्यंत पोलिसांनी पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

SCROLL FOR NEXT