मुंबई

‘मी ठीक आहे’ म्हणत तरुण दडवतात भावना

CD

‘मी ठीक आहे’ म्हणत तरुण दडवतात भावना
४९.५ टक्के तरुण भावनिक अडचणी स्वतःपुरत्याच ठेवतात; केवळ ९.२ टक्के जणांची तज्ज्ञांकडून मदत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढत असली, तरी भावनिक तणावाचा सामना करताना देशातील तरुण मोठ्या प्रमाणात एकटे पडत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. १८ ते २५ वयोगटातील ४९.५ टक्के तरुण आपल्या भावनिक अडचणी स्वतःपुरत्या ठेवतात आणि त्यावर स्वतःच मात करण्याचा प्रयत्न करतात, तर केवळ ९.२ टक्के तरुणांनी मानसिक आरोग्यतज्ज्ञांकडून मदत घेतल्याचे सांगितले आहे.
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या पार्श्वभूमीवर एमपॉवरने केलेल्या ‘अनपॅक युअर इमोशनल बॅगेज’ या सर्वेक्षणात देशातील दहा शहरांमधील तरुणांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित अनुभवांचा आढावा घेण्यात आला. मुंबई, पुणे, दिल्ली-एनसीआर, बंगळूर, कोलकाता, अहमदाबाद, गोवा, हैदराबाद, चेन्नई आणि जयपूर येथील १८ ते २५ वयोगटातील तरुणांनी यात सहभाग घेतला.
तरुणांनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर मिळणाऱ्या प्रतिक्रियांमध्येही मोठी तफावत आढळली. ४०.४ टक्के प्रतिसादकांना ‘मजबूत राहा’ असा सल्ला मिळतो, तर काहींना ‘अतिविचार करू नका’ किंवा ‘अभ्यास आणि कामावर लक्ष केंद्रित करा’ असे सांगितले जाते, मात्र केवळ १३.६ टक्के तरुणांनी कोणताही पूर्वग्रह न ठेवता आपले म्हणणे ऐकून घेणारा आणि पाठिंबा देणारा अनुभव व्यक्त केला.
मानसिक आरोग्याबाबत केवळ जागरूकता निर्माण करून पुरेसे होणार नाही, तर तरुणांना भावनिक अडचणी व्यक्त करण्यासाठी सुरक्षित आणि पूर्वग्रहविरहित वातावरण मिळणे आवश्यक आहे, असा निष्कर्ष सर्वेक्षणातून अधोरेखित झाला आहे.

‘मी ठीक आहे’ म्हणत दडवतात भावना
सर्वेक्षणातील ४०.९ टक्के तरुणांनी आपण मानसिकदृष्ट्या ठिक नसतानाही इतरांना ‘मी ठिक आहे’ असे सांगत असल्याचे नमूद केले. भावनिक त्रासाबाबत चर्चा टाळणे, स्वतःला सतत व्यस्त ठेवणे किंवा समस्येकडे दुर्लक्ष करणे, अशा पद्धतीने अनेक तरुण परिस्थितीशी जुळवून घेत असल्याचे दिसून आले.

महिलांमध्ये अतिविचार, पुरुषांमध्ये आर्थिक ताण
सर्वेक्षणात तरुण महिला आणि पुरुषांच्या भावनिक तणावाच्या कारणांमध्ये फरकही दिसून आला. महिलांमध्ये अतिविचार करण्याचे प्रमाण ६० टक्के, स्वतःविषयी शंका ५६ टक्के आणि शरीरयष्टीविषयी चिंता ६९ टक्के असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पुरुषांमध्ये कामाशी संबंधित ताण (५७ टक्के) आणि आर्थिक असुरक्षितता (५४ टक्के) ही प्रमुख कारणे असल्याचे आढळले. तसेच काहीतरी बिनसले आहे याची जाणीव दुसऱ्या व्यक्तीने करून दिल्यानंतरच होणाऱ्या प्रतिसादकांमध्ये पुरुषांचे प्रमाण ६० टक्के होते.

चिडचिड, एकाग्रतेवर परिणाम
भावनिक तणावाचा दैनंदिन जीवनावरही परिणाम होत असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले. ४७ टक्के तरुणांनी सहज राग येणे किंवा चिडचिड होणे ही लक्षणे सांगितली. त्यानंतर लक्ष केंद्रित करण्यात किंवा आवडत्या गोष्टींचा आनंद घेण्यात अडचण येणे (३६.७ टक्के) आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम होणे (३१.३ टक्के) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT