मुंबई

गणेशोत्सवासाठी कृत्रिम फुलांची बाजारपेठ फुलली

CD

गणेशोत्सवासाठी कृत्रिम फुलांची बाजारपेठ फुलली
कापडी फुलांसह चीनमधील सजावटीच्या साहित्याला मागणी; ४० रुपयांत डझनभर फुलांची उपलब्धता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बाजारपेठा सजावटीच्या साहित्याने गजबजू लागल्या आहेत. दादर, लालबाग-परळ आणि क्रॉफर्ड मार्केट परिसरात गणेशमूर्तीच्या स्वागतासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. यंदा ताज्या फुलांऐवजी टिकाऊ आणि वर्षानुवर्षे वापरता येणाऱ्या कृत्रिम फुलांना ग्राहकांची पसंती मिळत असल्याचे बाजारपेठेतील चित्र आहे.
कापडी फुले, फुलांच्या लडी, जास्वंदीच्या पानांच्या प्रतिकृती तसेच चीनमध्ये तयार होणाऱ्या विविध प्रकारच्या कृत्रिम फुलांची विक्री वाढली आहे. ४० रुपयांपासून डझनभर फुलांचे संच उपलब्ध असून, घरगुती गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी विविध आकार आणि रंगांतील फुले बाजारात दाखल झाली आहेत.
ताजी फुले काही तासांत कोमेजण्याची शक्यता असते. त्यासाठी दररोज पाणी मारणे आणि देखभाल करावी लागते. याउलट कृत्रिम फुलांचा वापर संपूर्ण उत्सवकाळात करता येतो. शिवाय त्यांची योग्य देखभाल केल्यास पुढील वर्षीही पुनर्वापर शक्य असल्याने अनेक ग्राहक त्यांना पसंती देत आहेत.

ग्रामीण भागातूनही खरेदीसाठी गर्दी
क्रॉफर्ड मार्केटमध्ये मुंबईबाहेरील ग्राहकांचीही मोठी वर्दळ दिसून येत आहे. पालघर, रायगड आणि पनवेल परिसरातून गणेशोत्सवाच्या सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक दरवर्षी या बाजारपेठेत येतात. विविध प्रकारची फुले, तोरणे आणि सजावटीचे संच एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने ग्राहकांचा ओढा कायम आहे. पाश्चात्त्य पद्धतीच्या गुलाब, ट्युलिप आणि ऑर्किडसह पारंपरिक झेंडू व मोगऱ्याच्या कृत्रिम फुलांचीही मागणी आहे. घरगुती सजावटीपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपर्यंत या फुलांचा वापर वाढताना दिसत आहे.

...म्हणून कृत्रिम फुलांचा पर्याय
नैसर्गिक फुलांच्या विक्रीवर कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापराचा परिणाम होत असला, तरी उत्सवाच्या काळात होणारी गर्दी, फुलांची वाहतूक आणि देखभालीचा खर्च यांचा विचार करता हा पर्याय सोयीचा ठरतो. कृत्रिम फुलांचा वापर केल्याने सजावट दीर्घकाळ टिकते, असे कोकणातील गणेशभक्त सुनील पावसकर यांनी सांगितले.

असे आहेत कृत्रिम फुलांचे दर
कपड्याच्या फुलांच्या लडी : २४० ते ३५० रुपये जोडी
फायकस पानांची सजावट : सुमारे ७०० रुपये
चीनमधील कृत्रिम फुले : ४० रुपये डझन
घरगुती सजावटीसाठी दर्शनीय फुलांचा संच : सुमारे ८०० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

Pune Fraud News : आजार बरा करण्‍याच्‍या बहाण्‍याने भोंदू महिलेने उकळले ४५ हजार; बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

PF खात्यातून इमर्जन्सीत पैसे काढायचे आहेत? EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे!

Latest Marathi News Live Update : ३५ दिवसांचा दुष्काळी खंड संपला; यवतमाळ-वणीत पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवदान

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

SCROLL FOR NEXT