खारघरमध्ये ‘शिवनेरी’ महापौर निवासाचे लोकार्पण
आधुनिक सुविधांनी सुसज्ज वास्तूची भर; आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल, ता. ११ (बातमीदार) : पनवेल पालिकेच्या वतीने खारघर सेक्टर-२१ येथे उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या अत्याधुनिक महापौर निवासस्थानाचा लोकार्पण सोहळा गुरुवारी (ता. १०) आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या वास्तूमुळे पनवेल पालिकेच्या वैभवात आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची भर पडली आहे.
या सोहळ्यास आमदार प्रशांत ठाकूर, योगेश सागर, महेश बालदी, निरंजन डावखरे, जिल्हा परिषद रायगडचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, महापौर नितीन पाटील, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, आयुक्त मंगेश चितळे, उपमहापौर प्रमिला पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी गेल्या १० वर्षांत पनवेल महापालिकेने विविध विकासकामे आणि प्रकल्प साकारल्याचे सांगत महापौर निवासस्थानाची उभारणी ही अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले. या प्रकल्पासाठी तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांनी घेतलेल्या पुढाकाराचेही त्यांनी कौतुक केले.
शिवनेरी महापौर निवासस्थान हा पनवेल पालिकेच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे. एक एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागत आहेत. विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि महामार्गाच्या माध्यमातून पनवेलचा वेगाने विकास होणार आहे. भविष्यात पनवेल देशातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये नवी ओळख निर्माण करेल, असा मला विश्वास आहे.
- नितीन पाटील, महापौर, पनवेल महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.