मुंबई

लालबागच्या राजाच्या प्रसादातील ओल्या कचऱ्यापासून तयार होणार वीज

CD

‘लालबागचा राजा’च्या प्रसादातील ओल्या कचऱ्यापासून तयार होणार वीज
११ दिवसांत सुमारे ८० मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ ः लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या समन्वयाने अभिनव ‘प्रसाद ते ऊर्जा’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत मंडळाच्या प्रसाद कक्ष व अन्नछत्रामधून निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर बायोमिथेनेशन प्रक्रियेद्वारे शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यात येणार आहे. ११ दिवसांत सुमारे ८० मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे.
गणेशोत्सवाच्या कालावधीत मंडळाच्या प्रसाद वितरण आणि भोजन सुविधांमधून दररोज सुमारे ८ ते १० मेट्रिक टन अन्न व जैविक कचरा निर्माण होण्याचा अंदाज आहे. या कचऱ्याचे निर्मितीस्थळी योग्य विलगीकरण करून पालिकेचे नायर रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय, जीटीबी रुग्णालय आणि शीव रुग्णालय येथील बायोमिथेनेशन प्रकल्पांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
प्रत्येक प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता सुमारे दोन मेट्रिक टन प्रतिदिन आहे. या उपक्रमांतर्गत ११ दिवसांत सुमारे ८० मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून अंदाजे सात हजार ७४४ युनिट नवीकरणीय वीज निर्माण करण्याचे नियोजन आहे. प्रत्यक्ष वीजनिर्मिती ही विलगीकृत कचऱ्याचे प्रमाण व गुणवत्ता तसेच प्रकल्पांच्या कार्यस्थितीवर अवलंबून राहील, असेही उपायुक्त दिघावकर यांनी सांगितले.
मोठ्या सार्वजनिक उत्सवांमध्ये निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याचे योग्य विलगीकरण आणि शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्यापासून उपयुक्त ऊर्जा निर्माण करता येते, हे या उपक्रमातून अधोरेखित होणार आहे. त्याचबरोबर पारंपरिक कचरा विल्हेवाट व्यवस्थेवरील भार कमी होऊन पालिकेचा पैसा वाचेल, असेही त्यांनी सागितले.
रुग्णालयासाठी वापरणार वीज
निर्माण होणारी वीज रुग्णालयांतील रुग्ण कक्ष, मार्गिका आणि अन्य सामायिक परिसरातील प्रकाशव्यवस्थेसह योग्य कामांसाठी वापरण्यात येणार आहे. पालिकेने नियुक्त केलेली मेसर्स एरोकेअर एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था या प्रकल्पाचे परिचालन व देखभाल करीत असल्याचेही त्यांनी सागितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT