तरुणीविरोधात गुन्हा दाखल
ठाणे, ता. ११ : आधीचा पासपोर्ट असतानाही त्याची माहिती लपवून मुंब्य्रातील नातेवाइकाचा पत्ता वापरत नव्याने ‘तत्काळ’ पासपोर्ट मिळविल्याप्रकरणी कुर्लामधील नमीराह तारिक खानला (१९ ) महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) ठाणे युनिटने ताब्यात घेत चौकशी केली. तसेच याप्रकरणी ९ सप्टेंबरला मुंब्रा पोलिस ठाण्यात पासपोर्ट अधिनियम व फसवणुकीच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नमीराहकडे लखनौ येथून मिळालेला पासपोर्ट यापूर्वीच होता. या पासपोर्टवरून तिने २०१४ आणि २०१६ मध्ये परदेश प्रवास केला होता. असे असतानाही सप्टेंबर २०२५ ते मार्च २०२६दरम्यान तिने मुंब्य्रातील एका नातेवाइकाचा पत्ता देत नव्या पासपोर्टसाठी अर्ज केला. ऑनलाइन अर्जात जुन्या पासपोर्टचा तपशील लपविल्याचे तपासात समोर आले. एजंट आमीन आणि भाऊ मोहसीन यांच्या मदतीने तिने पासपोर्ट मिळविल्याचा आरोप आहे. मार्च २०२६ मध्ये मुंब्रा पोलिसांकडून पत्त्याची पडताळणीही करून घेण्यात आली. या प्रकरणाची माहिती एटीएसला सुमारे दोन महिन्यांपूर्वी मिळाल्यानंतर नमीराहवर लक्ष ठेवण्यात आले होते. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नमीराहचे वडील तारिक खान (५२) हे इंडियन मुजाहिदीन आणि सिमीशी संबंधित प्रकरणातील फरार आरोपी असून, २०११ पासून परदेशात भूमिगत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे नमीराहने दुसरा पासपोर्ट कोणत्या कारणासाठी मिळविला, यासह तिच्या वडिलांशी संबंधित संभाव्य बाबींचाही एटीएस आणि मुंब्रा पोलिस तपास करीत आहेत.
..............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.