मुंबई

एसआरएचा निष्क्रिय विकसकांना दणका

CD

एसआरएचा निष्क्रिय विकसकांना दणका
तीन वर्षांत ४५० हून अधिक प्रकल्प घेतले काढून
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडविणाऱ्या तसेच करारनाम्यातील अटींचे उल्लंघन करणाऱ्या विकसकांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) दणका दिला आहे. तीन वर्षांत एसआरएने तब्बल ४५० हून अधिक प्रकल्प विकसकांकडून काढून घेण्याची कारवाई केली आहे. महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ मधील कलम १३ (२) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

एसआरएने २०२४-२५मध्ये २४३ प्रकल्पांतील विकसकांवर, त्यानंतर २०२५-२६मध्ये १५४ प्रकल्पांतील विकसकांवर, तर चालू वर्षात आतापर्यंत ७४ प्रकल्पांत विकसक हटविण्याची कार्यवाही केली आहे. अनेक प्रकल्प वर्षानुवर्षे रखडल्याचे निदर्शनास आले आहे. केवळ प्रस्ताव सादर करून प्रत्यक्षात विकासकामे सुरू न करणाऱ्या विकसकांमुळे हे प्रकल्प रखडत असून, झोपडपट्टीतील रहिवासी त्यांच्या हक्काच्या पुनर्वसन सदनिकांपासून वंचित राहत आहेत. विकसकांनी प्रस्ताव सादर करूनही अनेक वर्षे प्रकल्प रखडले होते. प्रत्यक्षात प्रकल्पाच्या ठिकाणी कोणतीही ठोस प्रगती झालेली नव्हती. त्यामुळे झोपडीधारक आणि पात्र रहिवाशांचे मोठे नुकसान होत होते.

रहिवाशांना त्यांच्या हक्काची पुनर्वसन घरे मिळण्यास विलंब होत असल्याने विकसक काढून टाकण्याची कारवाई करण्यात आल्याचे एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पांसाठी आता नव्याने विकसकाची नियुक्ती केली जाईल किंवा समूह पुनर्विकासांतर्गत हे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील, अशी माहितीही कल्याणकर यांनी दिली.
--------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT