मुंबई

ठाण्याच्या जंगलावर टीडीआरचा घाला?

CD

ठाण्याच्या जंगलावर टीडीआरचा घाला?
टिकुजीनीवाडीजवळ ‘राष्ट्रीय उद्यान वाचवा’ आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : शहराच्या हिरव्या फुप्फुसांवर विकासाच्या नावाखाली आर्थिक व्यवहारांचा घाला घातला जात असल्याचा आरोप करीत पर्यावरणप्रेमींनी शनिवारी प्रशासनाविरोधात रणशिंग फुंकले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील वनजमिनीला ठाणे महापालिकेने ‘जैवविविधता उद्यान’ शहर आरक्षण दिल्याचा दावा करण्यात आला आहे. या जागेच्या मोबदल्यात खासगी कंपनीला ३,७०० कोटी रुपयांचा हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) देण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. वनजमिनीच्या कथित हस्तांतरणाला विरोध करीत संबंधित जागेवर कोणतेही काम सुरू करू नये, अशी मागणी ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वाचवा’ अभियानांतर्गत करण्यात आली.
टिकुजीनीवाडीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सकाळी साडेसात वाजता झालेल्या आंदोलनात हरी ओम ट्रेकर्ससह विविध पर्यावरणप्रेमी आणि नागरिक सहभागी झाले होते. ‘जंगल वाचवा, ठाण्याचा श्वास वाचवा’ आणि ‘राष्ट्रीय उद्यान वाचवा, निसर्गाचा वारसा जपा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. स्वप्नील महिंद्रकर आणि विजय रांजणे यांच्या पुढाकाराने झालेल्या या आंदोलनात वनक्षेत्रावरील अतिक्रमण, अनियंत्रित बांधकाम आणि व्यावसायिक वापराला विरोध करण्यात आला. गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ वन विभागाच्या ताब्यात असलेल्या या जागेला महापालिकेने शहर आरक्षण दिल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या जागेच्या मोबदल्यात खासगी कंपनीला सुमारे ३,७०० कोटी रुपयांचा टीडीआर देण्यात आल्याचा दावाही करण्यात आला. वनजमिनीशी संबंधित हा कथित व्यवहार केवळ आर्थिक नसून, ठाण्याच्या पर्यावरणीय भवितव्याशी निगडित असल्याचे पर्यावरणप्रेमींनी स्पष्ट केले. वनक्षेत्र, जैवविविधता आणि वन्यजीवांचे अधिवास सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. जंगलाच्या जागेवर विकासाचे आरक्षण देऊन भविष्यात बांधकामाला मार्ग मोकळा केला जाणार नाही ना, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.

निर्णयापर्यंत टीडीआर स्थगित करा
या जागेसंदर्भात वन विभाग सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. त्यामुळे अंतिम निकाल लागेपर्यंत ठाणे महापालिकेने संबंधित जागेचा टीडीआर स्थगित करावा. तसेच या जागेवर कोणत्याही प्रकारचे काम सुरू करू नये, अशी मागणी पर्यावरणप्रेमी स्वप्नील महिंद्रकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT