मुंबई

उपासना सिंह यांच्या पॅनेलचा ‘सिंटा’ निवडणुकीत विजय

CD

उपासना सिंह यांच्या पॅनेलचा ‘सिंटा’ निवडणुकीत विजय

मुंबई, ता. १२ : अंतर्गत मतभेद आणि मागील कार्यकारिणीतील सदस्यांच्या राजीनाम्यांमुळे चर्चेत आलेल्या सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशनच्या (सिंटा) नव्या कार्यकारिणीसाठी झालेल्या निवडणुकीत अभिनेत्री उपासना सिंह यांनी सर्वाधिक मते मिळवत आघाडी घेतली. शनिवारी (ता. १२) झालेल्या या निवडणुकीत उपासना सिंह यांना ३६० मते मिळाली. साहिला चढ्ढा ३५७ मतांसह दुसऱ्या, तर विकास वर्मा ३४९ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
ज्येष्ठ अभिनेते दीपक पराशर यांना ३४८, तर कुनिका सदानंद यांना ३१२ मतं मिळाली. याशिवाय वर्षा उसगावकर यांना ३०६, नगमा मोरारजी यांना २९० आणि निमाई बाली यांना २६६ मतं मिळाली. अर्जुन/फिरोज खान, अरमान ताहिल, शहजाद खान आणि मनीष कुमार चतुर्वेदी यांच्यासह एकूण १५ सदस्यांची नव्या कार्यकारिणीसाठी निवड झाली. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजच्या देखरेखीखाली ही निवडणूक पार पडली. न्यायालयाने १२ तारखेला मतदान घेण्यास परवानगी दिल्यानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी नव्या कार्यकारिणीचे स्वागत केले असून, समितीत महिलांचे लक्षणीय प्रतिनिधित्व असल्याचे नमूद केले. २६ ऑक्टोबरनंतर ही समिती अधिकृतपणे कामकाज सुरू करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

SCROLL FOR NEXT