गणेशोत्सवापूर्वी झेंडूचे भाव कोसळले
७०-८० रुपये किलोचा झेंडू थेट १० ते ३० रुपयांवर
कल्याण, ता. १२ (वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या काळात झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने विविध जिल्ह्यांतून शेतकरी कल्याण एपीएमसीच्या फूल बाजारात दाखल झाले, मात्र बाजारात फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने झेंडूच्या भावात मोठी घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वी ७० ते ८० रुपये किलोने विकला जाणारा झेंडू आता अवघ्या १० ते ३० रुपये किलो भावाने विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फुले बाजारात आणण्याचा वाहतूक खर्चही काढणे कठीण झाले आहे.
गणेशोत्सवाच्या तोंडावर फुलांचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फुले विकून मिळणाऱ्या पैशातून गाडीचे भाडे आणि इतर खर्चही भागत नाहीत. त्यामुळे काही शेतकऱ्यांवर फुले कचऱ्यात फेकून देण्याची वेळ आली आहे. एका फूल व्यापाऱ्याने सांगितले की, यंदा पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फुलांची लागवड केली. मागील वर्षी नुकसान झाल्याने यंदा कमी भांडवलात जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला, मात्र उत्पादन वाढल्याने बाजारात फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याचा थेट परिणाम भावावर झाला. फुले हे नाशवंत असल्याने ती एक-दोन दिवसांत विकावी लागतात. बाजारात ग्राहक कमी आणि आवक जास्त असल्याने फुले विकणेही अवघड होत आहे. परिणामी काही शेतकऱ्यांना फुले फेकून देण्याची वेळ येत असल्याचे व्यापाऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.