मुंबई

गणेशमूर्तीपासून साकारणार नवे रोपटे

CD

गणेशमूर्तीपासून साकारणार नवे रोपटे
री-सस्टिनअबिलिटीचा पर्यावरणपूरक उपक्रम
पनवेल, ता. १३ (बातमीदार) : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी री-सस्टिनअबिलिटी लिमिटेडच्या वतीने ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव-२०२६’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पाच हजार पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे मोफत वितरण करण्यात येत असून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. श्रद्धेने हा उत्सव साजरा करताना पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारीही स्वीकारावी, या उद्देशाने कंपनीने हा उपक्रम हाती घेतला आहे. कंपनीचे कर्मचारी, गृहनिर्माण संस्थांचे सभासद, शासकीय अधिकारी तसेच समाजातील विविध घटकांना या मूर्तींचे मोफत वितरण केले जात आहे.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात सहज विरघळत नसल्याने जलप्रदूषण होते. तसेच रासायनिक रंगांचा जलचर सृष्टीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नैसर्गिक माती, नारळाच्या तंतूंपासून तयार केलेले कोकोपीट, बियाणे गोळे आणि सेंद्रिय खत यांचा वापर करून या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.

हरित संवर्धनाला चालना
या गणेशमूर्तींचे विसर्जन पाण्यात न करता घरच्या घरी कुंडीत करता येणार आहे. मूर्ती मातीत मिसळल्यानंतर त्यातील बियाण्यांपासून नवीन रोपटे उगवणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून जलप्रदूषण टाळण्याबरोबरच घराघरांत हरित संवर्धनाला चालना मिळणार आहे. नागरिकांनी श्रद्धा, भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाची सांगड घालत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन कंपनीने केले आहे. या उपक्रमासाठी संदीप महाजन, रामदास गोलार आणि सतेज दिवस यांचे सहकार्य लाभले. प्रत्येक घरातून एका नव्या रोपट्याची निर्मिती व्हावी, हा आमचा प्रयत्न आहे. भावी पिढ्यांसाठी स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण निर्माण करण्यासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारावेत, असे कंपनीचे संचालक सोमनाथ मालघर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

Central Railway: मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली! कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल ठप्प, ४५ मिनिटं प्रवाशांचा खोळंबा

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

Marathi News Live Updates : अरविंद केजरीवाल यांची 'गोवा फॉरवर्ड पार्टी' आणि 'आम आदमी पार्टी' च्या युतीची घोषणा

SCROLL FOR NEXT