वज्रेश्वरी, ता. १५ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील कोनगाव परिसरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कचरा टाकण्यासाठी जागेची अडचण झाल्याने भिवंडीचे तहसीलदार अभिजित खोले यांनी जुन्या डम्पिंग ग्राउंडच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या.
एमआयडीसीअंतर्गत असलेल्या मेगासिटीने कचरा टाकण्यास प्रतिबंध केल्याने कोनगाव परिसरात कचरा व्यवस्थापनासाठी उपलब्ध जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जुन्या डम्पिंग ग्राउंडच्या जागेबाबत प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या प्रश्नाबाबत खासदार सुरेश म्हात्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कोनगावच्या डम्पिंग ग्राउंडची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार खोले यांना संबंधित जागेची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार त्यांनी जागेची पाहणी करत सद्यस्थितीची माहिती घेतली. ग्रामस्थांशी चर्चा करून कचरा व्यवस्थापनामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी महेंद्र म्हात्रे आणि द्वारकानाथ पाटील यांनी कोनगाव परिसरातील कचरा व्यवस्थापनाची समस्या, डम्पिंग ग्राउंडच्या जागेचा प्रश्न आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या.
या वेळी कोनगावच्या माजी सरपंच रेखा दीपक मुकादम, माजी उपसरपंच कमलाकर नाईक, विवेक म्हात्रे, विनोद म्हात्रे, मधु चंद्रकांत म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य रजनी कमलाकर नाईक, दर्शन म्हात्रे, महेंद्र भगत, शिवचेरोबा संघटनेचे अध्यक्ष राजू म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र म्हात्रे, डॉ. अमोल कराळे, दीपक मुकादम, द्वारकानाथ पाटील उपस्थित होते.
तहसीलदारांचे आश्वासन
तहसीलदार अभिजित खोले यांनी नागरिकांच्या मागण्या आणि समस्या जाणून घेत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नाला आता काही प्रमाणात गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.