मुंबई

शिक्षकांच्या हातूनच घडतो समाज

CD

बदलापूर, ता. १५ (बातमीदार) : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता कौशल्य, शिस्त आणि मूल्यांची शिकवण देऊन सक्षम नागरिक घडविण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांची आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाज घडविण्याची भूमिका शिक्षकांनी पार पाडावी, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विषयाच्या माजी विभागप्रमुख डॉ. शुभदा जोशी यांनी केले.
आदर्श विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने आदर्श विद्या संकुलातील शिक्षक दिन कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्या प्रा. डॉ. संगीता पांडे यांनी डॉ. शुभदा जोशी यांचा परिचय करून दिला. यावेळी त्यांनी ‘गीतारहस्य’ ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित करत प्राचीन काळापासून पूर्वजांनी निर्माण केलेल्या आदर्श परंपरा जपण्याचे आवाहन जोशी यांनी केले. शिक्षकांनी दिलेली आदर्श शिकवण आणि अडचणीच्या काळात दिलेला खंबीर आधार यामुळेच आपण समाजात उभे राहू शकलो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता पांडे या आपल्या विद्यार्थिनी असल्याचा आवर्जून उल्लेख करताना, आतापर्यंत ३१ विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन करण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
या वेळी आदर्श विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष जनार्दन घोरपडे, सचिव अशोक घोरपडे, महाविद्यालय नियामक मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर पातकर, खजिनदार रामचंद्र शेटे, सहसचिव राघवेंद्र देशपांडे, विश्वस्त तुषार आपटे, डॉ. उदय कोतवाल, संजय गायकवाड, मोहन जोशी, माजी सहसचिव विवेक मुळे, पंढरीनाथ बाविस्कर आदी उपस्थित होते.

४०० शिक्षकांचा गौरव
दरवर्षीप्रमाणे यंदाही आदर्श विद्या संकुलातील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी; तसेच विशेष गुणवत्ता प्राप्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त संकुलातील ४०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव केल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, तरीही संघात एक बदल! भारताच्या Playing XI मध्ये कोणाची एन्ट्री?

AI Powered Cancer Diagnosis: तंबाखू, प्रदूषण की केमिकल? DNA पाहून कॅन्सरचं ‘खरं कारण’ शोधणार आता AI!

Hadapsar News : थायलंडमधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस अभिजीत आर्ट्सचे डायमंड वर्क

Pune Rain Update : पुढील दोन दिवस शहरात पावसाची उघडीप

पाकिस्तानने मदत नाकारली! सौदीने थेट इस्रायलकडे मागितला गुप्तचर यंत्रणेचा सपोर्ट; हुती बंडखोरांचा उद्रेक

SCROLL FOR NEXT