मुंबई

जांभळी नाका पर्जन्यवाहिनीचे लवकरच काम

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : जुन्या जांभळी नाका ते पेढ्या मारुती मंदिर ते खाडी मार्गापर्यंतच्या ४० वर्षांच्या पर्जन्यवाहिनीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांच्या महासभेतील आक्रमक पवित्र्यानंतर संबंधित नाल्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले.

जांभळी नाका ते पेढ्या मारुती मंदिर ते क्रिक रोडपर्यंत बंदिस्त नाल्यामधील गाळ काढण्याचा ठराव सभागृहात शुक्रवारी (ता. ११) मंजुरीसाठी आला होता. त्या वेळी या नाल्यामुळे जांभळी नाका परिसर अनेक वर्षांपासून पुराच्या विळख्यात सापडला असल्याकडे कोळी यांनी लक्ष वेधले. या नाल्याची पुनर्बांधणी करण्यासाठी नऊ वर्षांपासून पाठपुरावा करीत असूनही दखल घेतली जात नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. एकेकाळी तब्बल १० फूट खोल असलेली जांभळी नाका ते पेढ्या मारुती मंदिर ते क्रिक रोडपर्यंतची पर्जन्यवाहिनी जांभळी नाक्याजवळ अवघी दीड फुटांवर आली आहे.

मासुंदा तलाव तुडुंब भरल्यानंतर पाण्याचा लोंढा जांभळी नाक्यावर आल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या भागात होलसेल बाजारपेठ व अनेक दुकाने असून, पावसाळ्यात नेहमी साचलेल्या पाण्यामुळे कोट्यवधींचे नुकसान होते. त्यामुळे नव्याने पर्जन्यवाहिन्या उभारण्याचे श्रेय कोणाला घ्यायचे असेल, त्याने घ्यावे, पण जांभळी नाका ते पेढ्या मारुती मंदिर ते क्रिक रोडपर्यंतच्या बंदिस्त नाल्याचे काम नव्याने करावे, अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT