राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी
१० हजार ७०३ प्रकरणे निकाली; ५८ कोटी आठ लाखांची तडजोड
अलिबाग, ता. १३ (वार्ताहर) : न्यायालयात प्रलंबित तसेच दाखलपूर्व वादांचा जलद आणि सामंजस्यपूर्ण निपटारा व्हावा, या उद्देशाने रायगड जिल्ह्यात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. या लोकअदालतीत दाखलपूर्व व प्रलंबित अशी एकूण १० हजार ७०३ प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. यामध्ये एकूण ५८ कोटी आठ लाख ७२ हजार ३६८ रुपयांची तडजोड झाली.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा रायगडचे पालक न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये, न्यायमूर्ती अद्वैत सेठना आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालती पार पडली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काही प्रकरणांतील पक्षकारांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामुळे दूरवरच्या पक्षकारांनाही सहभागी होता आले.
५० हजारांहून अधिक प्रकरणे
लोकअदालतीसमोर ३५ हजार ६५४ दाखलपूर्व आणि १४ हजार ८३६ प्रलंबित, अशी एकूण ५० हजार ४९० प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी पाच हजार ४६४ दाखलपूर्व आणि पाच हजार २३९ प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. यासाठी जिल्ह्यात २८ लोकअदालत कक्ष कार्यरत होते.
चार दाम्पत्यांचे संसार पुन्हा जुळले
रोहा, महाड आणि खालापूर येथील चार दाम्पत्यांचे वैवाहिक वाद सामंजस्याने मिटल्याने त्यांचे संसार पुन्हा जुळले. जिल्ह्यातील एकूण २३ वैवाहिक वादांची प्रकरणे निकाली काढण्यात आली.
७० अपघातग्रस्तांना ७.७० कोटींची भरपाई
एकूण ५१९ मोटार अपघात दावा प्रकरणे लोकअदालतीसमोर ठेवण्यात आली होती. त्यापैकी ७० प्रकरणे तडजोडीने निकाली काढून संबंधित पक्षकारांना सात कोटी ७० लाख ७३ हजार ४४२ रुपयांची नुकसानभरपाई मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.