मुंबई

शिक्षकांना गुरु सन्मान आरोग्य कार्ड

CD

शिक्षकांना गुरू सन्मान आरोग्य कार्ड
रामदास शेवाळे यांच्या पुढाकारातून कळंबोलीत वाटप; वैद्यकीय मार्गदर्शनाची सुविधा
पनवेल, ता. १३ (बातमीदार) : शिक्षक दिनाचे औचित्य साधून कळंबोली येथील सुधागड शाळेच्या जुन्या इमारतीत ‘गुरू सन्मान आरोग्य कार्ड वाटप सोहळा’ उत्साहात पार पडला. शिवसेना पनवेल-रायगड जिल्हाप्रमुख तथा पनवेल महापालिकेचे नगरसेवक रामदास वामन शेवाळे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
या वेळी शिक्षकांना आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून शिक्षकांसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन व निदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. शिक्षकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन मिळवून देणे, हा उपक्रमाचा उद्देश होता.
शिक्षक समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असून, विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि जीवनमूल्यांची शिकवण देतात. त्यामुळे गुरुजनांचा सन्मान करण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणेही आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उपक्रमाला शिक्षक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमास सुधागड कॉलेजचे प्राचार्य राजेंद्र पालवे, डॉक्टर पल्लवी कदम, युवा उद्योजक ओंकार शेवाळे यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होता. उपक्रमासाठी सहकार्य करणारे डॉक्टर, शिक्षक, नागरिक आणि कार्यकर्त्यांचे रामदास शेवाळे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

SCROLL FOR NEXT