१,२५० भजनी मंडळांना साहित्याचे वाटप
संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त रायगड जिल्हा परिषदेचा उपक्रम
पनवेल, ता. १३ (बातमीदार) : संत गाडगे महाराज यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील १,२५० भजनी मंडळांना भजनी साहित्याचे वाटप करण्यात आले. मंत्री आशीष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या उपक्रमामुळे भजन, कीर्तन आणि वारकरी परंपरेला बळ मिळणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी सांगितले.
भजन, कीर्तन आणि वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. ग्रामीण भागातील भजनी मंडळे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांतून ही परंपरा जपत आहेत. त्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेने केला.
संत गाडगे महाराजांनी स्वच्छता, सामाजिक प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजसेवेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांना अभिवादन करत हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, मंगेश वाकडीकर, पंचायत समिती सभापती रंजनाताई वास्कर, भाजप रायगड उत्तर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जे. एम. म्हात्रे, प्रीतम म्हात्रे आणि मधुकर पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कोट : “भजन, कीर्तन आणि वारकरी परंपरा हा आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”
— मंगेश वाकडीकर, जिल्हा परिषद अध्यक्ष, रायगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.