मुंबई

गणरायाच्या स्वागतासाठी पनवेलकर सज्ज

CD

गणरायाच्या स्वागतासाठी पनवेलकर सज्ज
शहरासह तालुक्यात ३९६ मंडळांसह ५१ हजार गणेशमूर्तींची होणार प्राणप्रतिष्ठापना; घरोघरी मंगलमय वातावरण, मोठा पोलिस बंदोबस्त
पनवेल, ता. १३ (बातमीदार) ः लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी पनवेल शहर आणि संपूर्ण तालुका सज्ज झाला आहे. शहरातील प्रमुख चौक, मुख्य रस्ते, गृहसंकुले आणि गणेश मंडप आकर्षक रोषणाईने व सजावटीने उजळून निघाले आहेत. पनवेल तालुका व पालिका क्षेत्रातील ३९६ सार्वजनिक मंडळांसह ५१ हजारांहून अधिक घरगुती गणेशमूर्तींची यंदा प्रतिष्ठापना केली जाणार आहे. उत्सव शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाला आज श्रीगणेश चतुर्थीला ब्राह्ममुहूर्तापासून गणपती स्थापना (प्राणप्रतिष्ठा) करण्यासाठी सकाळी ११:२० मिनिटांपासून ते दुपारी १:४८ मिनिटांपर्यंत शुभमुहूर्त आहे. या वेळेत आपल्या व गुरुजींच्या सोयीने घरातील गणेशाची स्थापना-पूजन करता येईल, असे दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले. यंदाचा गणेशोत्सव १३ दिवसांचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. श्रीगणेशाची स्थापना प्रातःकालापासून कोणत्याही वेळी करता येते. श्रीगणेश चतुर्थीच्या आधी एक दिवस किंवा त्याच दिवशी सकाळी मूर्ती आणावयास पाहिजे, असे नाही.

सेक्टर पेट्रोलिंग करणार
पनवेलमध्ये गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा, यासाठी पोलिस दलाने कंबर कसली आहे. पोलिस उपायुक्त रश्मी नांदेडकर यांनी संपूर्ण शहरात पोलिसांचे जाळे असेल, असे नियोजन केले आहे. पोलिस ठाण्यानुसार प्रत्येक ठिकाणी पोलिसांची सेक्टर पेट्रोलिंग असेल. त्यासाठी शेकडो पोलिस रस्त्यावर असतील.

डीजेच्या आवाजाला ५० डेसिबेलची मर्यादा
यंदा डीजेच्या आवाजावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मर्यादा घालण्यात आली आहे. त्यानुसार ५० डेसिबेलपर्यंतच आवाज वाढविता येईल. याबाबत गणेशोत्सव मंडळांना पोलिस आयुक्तांनी सूचना दिलेल्या आहेत. सर्वच ठाण्यांमध्ये ‘डेसिबेल मीटर’ देण्यात आले आहेत. पोलिसांकडून त्याचा वापर करून गणेश मंडळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.

४४,९३० मूर्ती
पनवेल शहर पोलिस ः ३८ सार्वजनिक, ७,३७८ खासगी अशा एकूण ८,२००
पनवेल तालुका ः ३० सार्वजनिक, ६१९८ खासगी अशा एकूण ६,२२७ मूर्ती
खांदेश्वर पोलिस ः ४६ सार्वजनिक, ११,६२६ खासगी अशा एकूण ११,६७२ मूर्ती
कामोठे ः ११ सार्वजनिक, ४,६४८ खासगी अशा एकूण ४,६५९ मूर्ती
कळंबोली ः ५७ सार्वजनिक, ८४६७ खासगी अशा एकूण ८,५२४ मूर्ती
तळोजा ः १९ सार्वजनिक, ३०२० खासगी अशा एकूण ३,०३९ मूर्ती
खारघर ः ६६ सार्वजनिक आणि ५,५६७ खासगी अशा एकूण ५,६३३ मूर्ती

गणेशोत्सव आनंददायी सण असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी. प्रशासनाने तालुक्यासह शहरातील सर्व विसर्जन घाटांची सोपी व्यवस्था करण्यात केली आहे. नागरिकांनी उत्साहाने सण साजरा करावा. इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्व पनवेलकरांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
- प्रशांत ठाकूर, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : डल्लुपुरा येथील धर्मशिला हॉस्पिटलजवळील गोदामाला आग

SCROLL FOR NEXT