मुंबई

आले, आले हो बाप्पा आले!

CD

आले, आले हो बाप्पा आले!
आज लाडक्या गणरायाचे जल्लोषात आगमन
अलिबाग, ता. १३ (वार्ताहर) ः सर्वांच्या लाडक्या विघ्नहर्त्या गणरायाचे आज जल्लोषात आगमन होत आहे. यंदा गणेशोत्सवाच्या काळात सलग सुट्ट्या आल्यामुळे मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या गावी दाखल झाले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये यंदा एकूण एक लाख पाच हजार ३४५ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार असून, यामध्ये २९१ सार्वजनिक तर एक लाख पाच हजार ५४ खासगी (घरगुती) गणेशमूर्तींचा समावेश आहे.
दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन करण्यावर भर देण्यात आला आहे. काही जणांनी आदल्या दिवशी रविवारीच तर काही जण सोमवारी गणेशमूर्ती घरी आणणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीने यावर्षी नशामुक्तीसह स्वच्छतेविषयी चलचित्राचे सादरीकरण करण्यात येत आहे. वेगवेगळे सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. गणपतीची मूर्ती घरी आणण्याची पद्धतही खास आहे. अनेक ठिकाणी आजही मूर्ती डोक्यावर घेऊन ढोल-ताशांच्या गजरात नाचत-गाजत गणरायाला घरी आणले जाते. घरातील स्त्रिया पायावर पाणी घालून आणि उदबत्तीचा सुवास पसरवून बाप्पाचे स्वागत करतात. कोकणातील घरांची सजावट साधी पण मनमोहक असते. घरातील भिंतींना लाल मातीचा मुलामा दिला जातो आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर करून मखर सजवले जाते. रानफुले, वेली, नारळ, सुपारी आणि इतर स्थानिक वस्तूंच्या मदतीने एक सुंदर आणि पारंपरिक आरास तयार होते.

आरत्या आणि भजने
उत्सवाच्या १० दिवसांत सकाळ-संध्याकाळ आरत्यांचा आणि भजनांचा आवाज गावोगावी घुमतो. प्रत्येक वाडीत भजनी मंडळ असते. भजन, गवळण, भारुड आणि शेवटचा गजर अशा पारंपरिक पद्धतीने भजन म्हटले जाते आणि त्यात सर्व गावकरी उत्साहाने सहभागी होतात.

पारंपरिक नृत्य आणि खाद्यपदार्थ
गणेशोत्सवादरम्यान कोकणातील जाखडी नृत्य आणि फुगडी यासारखे पारंपरिक विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. या नृत्यांमध्ये सर्व वयोगटातील लोक आनंदाने भाग घेतात. मोदकांबरोबरच पंचखाद्य (काजू, सुके खोबरे, चणाडाळ, शेंगदाणे आणि लाह्या) हा कोकणातील खास प्रसाद असतो.

जिल्ह्यातील एकूण गणपती : १ लाख ५ हजार ३४५
दीड दिवसाचे गणपती : २६ हजार १८२,
सहा दिवसांचे गणपती (गौरी-गणपती विसर्जन) : ५८ हजार १७२
अनंत चतुर्थीपर्यंत असणारे गणपती : १३ हजार ५९७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : डल्लुपुरा येथील धर्मशिला हॉस्पिटलजवळील गोदामाला आग

SCROLL FOR NEXT