मुंबई

गुरचरण जमिनींच्या व्यवहारांना एसआयटीचा ‘स्कॅन’

CD

गुरचरणच्या व्यवहारांना एसआयटीचा ‘स्कॅन’
कल्याणातील सहा गावांतील व्यवहारांची ३० दिवसांत चौकशी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १३ : कल्याण तालुक्यातील सहा गावांतील गुरचरण जमिनींचे हस्तांतरण, वर्ग-२ मधून वर्ग-१ रूपांतरण आणि त्यानंतर झालेले खरेदी-विक्री व्यवहार आता एसआयटीच्या चौकशीच्या कक्षेत आले आहेत. माणगाव, कोळे, काटई, घारीवली, संदप आणि उसरघर या गावातील या जमिनी आहेत. या व्यवहारांची कागदपत्रांसह सखोल तपासणी करून ३० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत.
या जमिनींचे नियमबाह्य हस्तांतरण, वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतरण, नजराणा अथवा अनर्जित रकमेचे समायोजन आणि त्यानंतर मे. प्रीमियर ऑटोमोबाईल्स लिमिटेड व अनंत डेव्हलपर्स, ज्युपिटर लाइफ लाइन हॉस्पिटलसह विविध विकसकांना झालेल्या व्यवहारांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १९ ऑगस्ट २०२६ मध्ये झालेल्या बैठकीत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार महसूल विभागाने ४ सप्टेंबरला याबाबत शासन आदेश जारी केला आहे. याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच संपूर्ण प्रकरणाची कागदपत्रांसह सखोल तपासणी करून ३० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
चौकशीदरम्यान शासकीय जमीन बळकावणे, अनियमितता किंवा पदाचा गैरवापर झाल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी, विकासक अथवा अन्य जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची शिफारस करण्याचे अधिकारही एसआयटीला देण्यात आले आहेत.

कोकण विभागीय आयुक्त अध्यक्ष
कोकण विभागीय आयुक्त हे या पथकाचे अध्यक्ष असून, ठाणे जिल्हाधिकारी, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एमएमआरडीएचे प्रतिनिधी, भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक, कोकण भवन येथील जमाबंदी आयुक्त तथा संबंधित अधिकारी, नोंदणी उपमहानिरीक्षक तथा मुद्रांक उपनियंत्रक आणि अपर जिल्हाधिकारी, ठाणे यांचा पथकात समावेश आहे. अपर जिल्हाधिकारी हे सदस्य सचिव असतील.

फेरफार नोंदींचीही तपासणी
एसआयटीकडून संबंधित गावांतील मूळ शासकीय गुरचरण जमिनींच्या नोंदी आणि त्यांच्या हस्तांतरणाची कायदेशीरता तपासली जाणार आहे. तसेच संबंधित जमिनी वर्ग-२ मधून वर्ग-१ करण्यासाठी पात्र होत्या का, जिल्हाधिकारी ठाणे यांच्या ३ मे २०१९ च्या आदेशानुसार करण्यात आलेल्या रूपांतरणात नियमांचे पालन झाले का आणि अनर्जित रकमेची गणना व समायोजन नियमानुसार झाले का, याचीही चौकशी होणार आहे.

विकसकांना झालेल्या व्यवहारांची छाननी
ज्युपिटर लाइफ लाइन हॉस्पिटल, आऊट एन आऊट इन्फोटेक, सुंदरनिवास प्रॉपर्टीज यांच्यासह अन्य विकसक किंवा संस्थांना झालेल्या जमीन खरेदी-विक्री व हस्तांतरण व्यवहारांची कागदपत्रे तपासली जाणार आहेत. या व्यवहारांमध्ये महसूल कायदा आणि शासनाच्या प्रचलित धोरणांचे पालन झाले होते का, याचा शोध एसआयटी घेणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT