मुंबई

विक्रोळीतील गणेशोत्सवात ‘हरवलेल्या गोष्टींचे संग्रहालय’

CD

विक्रोळीतील गणेशोत्सवात ‘हरवलेल्या गोष्टींचे संग्रहालय’
गणरायाच्या साक्षीने जपण्याचा भावनिक संदेश
घाटकोपर, ता. १५ (बातमीदार) ः काही गोष्टी हरवल्यानंतर त्यांची किंमत कळते; पण त्या हरवण्याआधीच जपल्या तर..? याच विचारातून विक्रोळी येथे यंदाच्या गणेशोत्सवासाठी ‘हरवलेल्या गोष्टींचे संग्रहालय’ ही आगळीवेगळी संकल्पना साकारण्यात आली आहे. सजावटकार दर्शना गोवेकर यांनी साकारलेला हा देखावा केवळ सजावट न राहता आपल्या आयुष्यातून हळूहळू दूर होत चाललेल्या निसर्गापासून नात्यांपर्यंतच्या अनेक गोष्टींची जाणीव करून देतो.
आजच्या धावपळीच्या जीवनात झाडं, जंगलं, स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, प्राणी-पक्षी यांच्यासोबतच एकत्र कुटुंब, एकत्र जेवण, मैत्री, संवाद आणि नात्यांमधील विश्वासही कुठेतरी मागे पडत चालला आहे. याच गोष्टी या संग्रहालयाच्या माध्यमातून भाविकांसमोर मांडण्यात आल्या आहेत.
हरवत चाललेल्या हिमनद्या, जंगलं, प्राणी-पक्षी आणि माणसांमधील जिव्हाळ्याची नाती यांचे प्रतीकात्मक दर्शन या देखाव्यातून घडते. विकासाच्या नावाखाली पुढे जाताना आपण नकळत काय गमावत आहोत, हा विचार हा देखावा पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो.
आज आपण अनेक गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर हरवताना पाहतोय, पण त्याची जाणीव आपल्याला उशिरा होते. उद्या आपल्या मुलांना या गोष्टी फक्त चित्रांमध्ये दाखवण्याची वेळ येऊ नये, अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच या गणेशोत्सवात गणरायाच्या चरणी ‘हरवलेल्या गोष्टींचे संग्रहालय’ उभं केलं. या संकल्पनेतून निसर्ग आणि नाती जपण्याचा संदेश देतानाच सजावटही शक्य तितकी पर्यावरणपूरक ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. टिकाऊ वस्तू आणि बायोडिग्रेडेबल प्लास्टिकचा वापर करून पर्यावरणाची काळजी घेण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे, असे सजावटकार दर्शना गोवेकर यांनी सांगितले. ‘हरवण्याआधी जपायला शिका’ हा साधा पण मनाला भिडणारा संदेश देणारी ही सजावट सध्या विक्रोळी परिसरात आकर्षण ठरत असून, देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांना काही क्षण थांबून विचार करायला भाग पाडत आहे.

पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंना प्राधान्य
या संपूर्ण सजावटीत टिकाऊ आणि पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंना प्राधान्य देण्यात आले असून, बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिकचाही वापर करण्यात आला आहे. पर्यावरण जपण्याचा संदेश देणाऱ्या संकल्पनेची अंमलबजावणीही पर्यावरणपूरक पद्धतीने करण्याचा प्रयत्न यामधून करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT