मुंबई

डम्पिंग ग्राउंड, भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत निवेदन

CD

डम्पिंग ग्राउंड, भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत निवेदन
धामणसई विभागातील ग्रामस्थांची नगराध्यक्षांकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी
रोहा, ता. १५ (बातमीदार) : रोहा नगरपालिका डम्पिंग ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता तसेच भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी धामणसई विभागातील ग्रामस्थांनी नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
डम्पिंग ग्राउंडलगतच नागरिकांच्या रहदारीचा मार्ग असल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कचऱ्यामध्ये अन्नपदार्थ असल्याने या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. नागरिक, शेतकरी तसेच या मार्गावरून जाणाऱ्यांवर कुत्र्यांकडून हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. गाईची वासरे, कोंबड्या आणि बकऱ्यांवरही कुत्रे हल्ले करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी, परिसराची नियमित स्वच्छता करावी तसेच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सुभाष भोकटे, विलास साळवी, नितेश जाधव, गजानन घाटवळ, धर्मा शेलार, निखिल सानप, महेश शेळके, सुशिल खांडेकर, नथुराम मालुसरे, सुनील मोहिते आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT