मुंबई

कारमधून गांजाची तस्करी सुसाट

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : नाशिकहून मुंबईच्या दिशेने कारमधून गांजाची वाहतूक करणाऱ्या तिघांना कोपरी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. आनंदनगर, कोपरी परिसरात ही कारवाई करण्यात आली. संशयितांकडून एक किलो २०२ ग्रॅम गांजा, कार, रोख रक्कम आणि मोबाईल असा सुमारे तीन लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. १२) रात्री गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेतील पोलिस हवालदार राजेंद्र आहिरे यांना मिळाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने आनंदनगर, कोपरी येथे सापळा रचला. रात्री संशयास्पद कार (एमएच ०२ एफजे ५१९०) आली असता, पोलिसांनी तपासणी केल्यावर राहुल संजय जैयस्वाल (वय ३०), मोहम्मद नादिर शफी शेख (३०) आणि उमाकांत रमाकांत यादव (२७) हे तिघे आढळले. राहुल याच्या ताब्यातील बॅगेची झडती घेतल्यावर त्यामध्ये प्लॅस्टिकच्या २२ पिशव्यांमध्ये गांजा आढळून आला. त्याचे वजन एक किलो २०२ ग्रॅम भरले. हा गांजा विक्रीसाठी मुंबईला घेऊन जात असल्याची कबुली राहुलने दिली.
---
मुरबाड पोलिसांची अमली पदार्थांविरोधात धडक
टोकावडे (बातमीदार) : अवैध अमली पदार्थांविरोधात मुरबाड पोलिसांनी धडक कारवाई करीत गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन जणांना अटक केली. त्यांच्याकडून एक किलो ९६० ग्रॅम गांजा, मोटारसायकल, फोन आणि अन्य साहित्य असा सुमारे एक लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अमली पदार्थांविरोधातील विशेष मोहिमेंतर्गत शनिवारी (ता. १२) सायंकाळी कल्याण-अहिल्यानगर मार्गावरील तीन हात नाका येथे पोलिसांनी सापळा रचला. या वेळी गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना मोटारसायकलीसह ताब्यात घेण्यात आले. त्यांची तपासणी केली असता गांजा आढळून आला. याप्रकरणी मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT