बस थांब्यासमोरील कचरा पालिकेने हटवला
धारावी, ता. १५ (बातमीदार) : पश्चिम द्रुतगती मार्गावरील पिवळा बंगला येथील राजीव गांधी नगर वस्तीसमोरील ‘धारावी कोळीवाडा’ या ‘बेस्ट’ बस थांब्यासमोरील कचरा अखेर पालिकेने हटवला आहे. ‘सकाळ’च्या ८ सप्टेंबरच्या अंकात ‘पिवळा बंगला बस थांबा बनला गैरसोयींचा अड्डा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत पालिकेने ही कारवाई केली.
धारावीतून सायन, कुर्ला, चेंबूर आदी भागांत जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा महत्त्वाचा बस थांबा आहे. या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून कचरा पेटीजवळ मोठ्या प्रमाणावर कचरा साचून तो रस्त्यावर पसरला होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने प्रवाशांसह स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागत होता.
धारावीतून शाळा-महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी तसेच विविध ठिकाणी कामानिमित्त जाणारे नागरिक मोठ्या संख्येने ‘बेस्ट’ बसचा वापर करतात. त्यामुळे बसची वाट पाहताना प्रवाशांना नाकाला रुमाल लावून उभे राहावे लागत होते. यामुळे प्रवासी आणि स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी होती. पालिका आणि ‘बेस्ट’ प्रशासनाने समन्वय साधून बस थांब्यावरील समस्या दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात येत होती. ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल घेत पालिकेने कचरा हटवून परिसराची स्वच्छता केली. या कारवाईबद्दल ज्येष्ठ समाजसेवक खुर्शीद शेख यांनी समाधान व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.