सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : समाजमाध्यमावरून सुरू झालेली मैत्री, त्यानंतर प्रेमाच्या आणाभाका आणि लग्नाच्या भूलथापा देत महिलेला पहिल्या पतीपासून घटस्फोट घेण्यास भाग पाडले. पुढे पती-पत्नीसारखे राहत वैदिक पद्धतीने लग्न केल्याचा दावा करत कथित बनावट विवाह प्रमाणपत्रही दाखवले, मात्र तब्बल ११ वर्षांनंतर संबंधित पुरुषाने दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याचे समोर आल्याने ५१ वर्षीय महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली. याप्रकरणी चितळसर पोलिसांनी मितेश काटकर याच्यासह त्याच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महिलेची २०१५ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून मितेशशी ओळख झाली. तो पोलिस दलात असल्याचे सांगून तिच्याशी जवळीक वाढवत होता. महिला विवाहित असल्याची माहिती असूनही त्याने लग्नाच्या भूलथापा दिल्या. अखेर २०१८ मध्ये महिलेने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर दोघे मानपाडा परिसरात पती-पत्नीसारखे राहत होते. मितेशने वकिलामार्फत विवाहाची प्रक्रिया झाल्याचे सांगून प्रमाणपत्र दाखवले. पुढे १ सप्टेंबर २०२१ रोजी मंदिरात हिंदू रितीरिवाजानुसार विवाह केल्याचा महिलेचा दावा आहे, मात्र लग्नाची पावती व फोटो मागितल्यावर मितेश टाळाटाळ करीत होता. लग्नाबाबत कुटुंबीयांना सांगण्याचा आग्रह केल्यावर शिवीगाळ, मारहाण आणि धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, विवाह प्रमाणपत्राची चौकशी केली असता ते बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर २०२५ मध्ये व्हॉट्सॲपवर आलेल्या संदेशातून मितेशने शुभांगी नामक महिलेशी लग्न केले असून, त्यांना मुलगी असल्याची माहिती महिलेला मिळाली. पोलिसांनी मितेशसह त्याची आई, बहीण आणि भाऊजी यांच्या विरोधात चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.