धारावीत खड्ड्यांमधून गणरायाचे आगमन
धारावी, ता. १५ (बातमीदार) : गणरायाच्या आगमनासाठी भाविकांची लगबग सुरू असतानाच धारावीतील अनेक रस्त्यांवरील खड्ड्यांमधूनच गणेशमूर्ती न्याव्या लागल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. धारावी मुख्य रस्ता तसेच धारावी क्रॉस रोडवरील खड्ड्यांमधून वाट काढत मंगळवारी गणेशमूर्तींचे आगमन झाले.
मुंबईत गणेशमूर्ती नेताना खड्ड्यांमुळे दुर्घटना घडल्याच्या घटना घडल्या असतानाही पालिकेने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे चित्र आहे. गणेशमूर्ती सुरक्षितपणे मंडपापर्यंत नेण्यासाठी कार्यकर्त्यांना खड्ड्यांमधून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली. सुदैवाने धारावीत खड्ड्यांमुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही.
काही दिवस मुंबईत पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पालिकेने अनेक ठिकाणी रस्त्यांची डागडुजी केली होती, मात्र गेल्या दोन दिवसांत पावसाने पुन्हा जोर धरल्याने या तात्पुरत्या मलमपट्टीची पोलखोल झाली आहे. दरवर्षी गणेशमूर्ती नेताना कार्यकर्त्यांना खड्ड्यांचा सामना करावा लागतो. यंदाही हीच परिस्थिती कायम राहिल्याने भाविकांमध्ये संताप आहे. गणेश विसर्जनापूर्वी धारावीतील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करावेत, अशी मागणी स्थानिक रहिवासी सचिन चौगुले यांनी केली आहे. पालिकेने वेळीच उपाययोजना न केल्यास विसर्जनाच्या वेळीही भाविकांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.