मुंबई

गणेश विसर्जनासाठी मुलुंडमध्ये १० ठिकाणी विशेष व्यवस्था

CD

गणेश विसर्जनासाठी मुलुंडमध्ये १० ठिकाणी विशेष व्यवस्था
मुलुंड, ता. १५ (बातमीदार) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन सुरळीत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडावे, यासाठी मुंबई महापालिकेच्या टी विभागाने मुलुंड परिसरात विशेष व्यवस्था केली आहे. नैसर्गिक आणि कृत्रिम अशा एकूण १० विसर्जनस्थळी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घराजवळील कृत्रिम विसर्जन तलावांचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करणे अपेक्षित आहे. विसर्जनस्थळी होणारी गर्दी कमी करणे, भाविकांना घराजवळ विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण रोखणे, या उद्देशाने मुलुंडमध्ये सात कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत.
मुलुंड पूर्व येथे वामनराव शाळेजवळ, मोरया तलाव परिसर, व्ही. पी. एम. शाळेजवळील गणेश घाट, मिठागर रोड, पांडुरंग भोईर आणि हरिओमनगर येथे विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे, तर मुलुंड पश्चिम येथे स्वप्न नगरी, कालिदास पी. के. रोड आणि बारकू पाटील उद्यान, ए. सी. सी. रोड परिसरात कृत्रिम तलाव उपलब्ध आहेत. गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसर्जनाच्या मार्गांवरील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली असून, आवश्यक ठिकाणी झाडांच्या फांद्यांची छाटणीही करण्यात आली आहे. विसर्जनाच्या दिवशी सर्व १० ठिकाणी स्वयंसेवक तैनात राहणार आहेत. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, पुरेशी विद्युत व्यवस्था तसेच गरजेनुसार जनरेटरची सुविधा उपलब्ध असेल. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी वैद्यकीय पथके आणि जीवरक्षकही तैनात करण्यात येणार आहेत. प्रमुख विसर्जनस्थळी सूचना देण्यासाठी व्यासपीठांची व्यवस्था करण्यात येणार असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसही तैनात राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT