मुंबई

डीजेला फाटा देऊन ढोलताशांचा निनाद

CD

डीजेला फाटा देऊन ढोलताशांचा निनाद
वाशी, ता. १५ (बातमीदार) ः गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा जयघोषात नवी मुंबईत सोमवारी (ता. १४) घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंगळवारी (ता. १५) दीड दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. यंदा सार्वजनिक मंडळांसह नवी मुंबईकरांनी डीजेच्या दणदणाटाला फाटा देत पारंपरिक ढोल-ताशांचा निनाद, सनई-चौघडे, फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करीत बाप्पाचे स्वागत केले.
नवी मुंबईतील सर्वच नोड्समध्ये लहान-मोठी मंडळे गणेशोत्सवात उत्साहाने सहभागी आहेत. तुर्भे येथील शिवछाया मित्रमंडळ व नवयुवक मित्रमंडळ, वाशी सेक्टर १७ येथील महाराजा गणेश उत्सव मंडळ, ऐरोलीतील श्री गणेश रहिवासी सेवा मंडळ, सेक्टर ६ ते ९ मधील बाळ गोपाळ मित्रमंडळ, लोकमान्य सेवा समिती सार्वजनिक गणेश मंडळ, अखिल दिवा-ऐरोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सानपाडा येथील सोनखारचा राजा, सीवूड्स, कोपरखैरणे, दिघा आणि सिडकोच्या मेघमल्हार वसाहतीसह विविध सोसायट्यांमध्ये गणरायाची भव्यदिव्य सजावट व देखाव्यांसह प्रतिष्ठापना करण्यात आली.

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती खरेदी करण्याकडे कल
यंदा पर्यावरणपूरक गणेशमूर्ती खरेदी करण्याकडे अनेकांचा कल राहिला. यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची विक्री तुलनेने कमी झाली असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले. यंदा नवी मुंबईत सुमारे २० हजार मूर्तींची विक्री झाल्याचे विक्रेत्याने सांगितले.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT