भिवंडी, ता. १५ (वार्ताहर) : सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या धामणकर नाका मित्रमंडळाच्या ‘एकात्मतेच्या राजा’चा सार्वजनिक गणेशोत्सवाचा दर्शन सोहळा मंगळवारी उत्साहात सुरू झाला. जिल्ह्यातील सहकार चळवळीतील ज्येष्ठ नेते आर. सी. पाटील यांच्या हस्ते सोहळ्याला सुरुवात झाली. या वेळी पडघा येथील मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना गणरायाचे प्रथम दर्शन घेण्याचा मान देण्यात आला.
भिवंडीत सामाजिक सलोखा जपण्याची गरज असताना हा गणेशोत्सव सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे, असे पाटील यांनी सांगितले. सण साजरा करताना इतरांना त्रास होणार नाही, याची नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांनी केले. यावेळी वृद्धाश्रमाला औषधे आणि ध्वनिक्षेपक संच भेट देण्यात आला. गणेशभक्तांच्या सुरक्षिततेसाठी मंडळ परिसरात बसविलेल्या २२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या प्रक्षेपण व्यवस्थेलाही सुरुवात केली. मंडळाच्या कार्यात योगदान देणाऱ्या शहाबुद्दीन शेख, सईद वायरमन आणि इब्राहिम भाई यांचा गौरव करण्यात आला. स्थानिक नृत्य अकादमीच्या विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केला. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या चित्रफितीत गणपती बाप्पा वऱ्हाळ तलावातून रस्त्याने चालत मंडपात येत असल्याचे दृश्य दाखविण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भिवंडी जिल्हा संघचालक नरेश मारू यांच्यासह सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन सांगळे, मिलिंद शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद पाटील, प्रभाग समिती क्रमांक तीनचे सहाय्यक आयुक्त नितेश चौधरी, ॲड. मनोज रायचा, विजय बल्लाळ, बलराज दोड्डी, विश्व हिंदू परिषदेचे दादा गोसावी, वैभव महाडिक, इस्कॉन मंदिराचे सुदाम प्रभू दास आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थाध्यक्ष संतोष शेट्टी, पदाधिकारी हसमुख पटेल, दिलीप पोद्दार, राजेश शेट्टी, राकेश पटवारी आणि संतोष जंपाल यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.