मुंबई

‘सेवा संकल्प अभियाना’साठी महापालिका सज्ज

CD

‘सेवा संकल्प अभियाना’साठी महापालिका सज्ज
नागरिकांना शासकीय सेवा-सुविधांचा लाभ देण्यावर भर
वाशी, ता. १५ (बातमीदार) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नवी मुंबई महापालिकेने नियोजन सुरू केले असून, आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व विभागांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याच्या सूचना दिल्या आहेत. अभियानांतर्गत सेवा सेतू, सेवा माझे योगदान, विकसित भारत संकल्प यात्रा, सेवाज्योत यात्रा, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, अंगणवाडी उत्सव, नमो सेवागाथा आणि जनसेवक महाकुंभ इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहेत.
जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, मालमत्ता कराशी संबंधित प्रमाणपत्रे इत्यादी लोकसेवा शून्य प्रलंबिततेसह उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिरे घेण्यात येणार आहेत. युवक, विद्यार्थी आणि नवकल्पना राबविणाऱ्या तरुणांसाठी कौशल्य, रोजगार व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जाणार आहे.

आदिवासी पाड्यांतील सुविधांचे होणार सर्वेक्षण
‘सेवा सेतू’ अभियानातून आदिवासी पाड्यांमध्ये पिण्याचे पाणी, दिवाबत्ती, स्वच्छता, रस्ते, गटारे आणि आरोग्य सुविधांचे सर्वसमावेशक सर्वेक्षण केले जाणार आहे. शासन व महापालिकेच्या योजनांचा लाभ नागरिकांना मिळत आहे की नाही, याचीही तपासणी होणार असून, प्रत्येक पाड्यासाठी पालक अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar News : नातवाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच आजीनेही सोडले प्राण; खानदेशी कुटुंबावर दुहेरी दुःखाचा आघात

Latest Marathi News Update : औसा तहसील कार्यालयावर महिलांचा मोर्चा; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्यात कार घालण्याचा प्रयत्न; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

Kannad News : शेतकऱ्यांमध्ये संभ्रम! कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीत २,५०५ शेतकरी पात्र

Pune Ganeshotsav : पुण्यात यंदा प्रथमच ‘राज्य सांस्कृतिक महोत्सव’; शनिवारवाड्यावर ढोल-ताशा, काव्य आणि लोककलेचा त्रिवेणी संगम

SCROLL FOR NEXT