मुंबई

गणेशोत्सवातून माणुसकीचा उत्सव

CD

गणेशोत्सवातून माणुसकीचा उत्सव
दुबई-मुंबईत व्यापार करणाऱ्या दोन तरुणांकडून सलग पाच वर्षे गरजूंना मदतीचा हात
घाटकोपर, ता. १५ (बातमीदार) : गणेशोत्सव म्हणजे केवळ आनंद, उत्साह आणि जल्लोष नव्हे, तर समाजाप्रती असलेली बांधिलकी जपण्याची संधीही आहे, हे असल्फा येथील दोन तरुणांनी आपल्या सामाजिक उपक्रमातून दाखवून दिले आहे. दुबई आणि मुंबईत व्यापार करणारे तसेच विघ्नहर्ता मित्र मंडळाचे कार्यकर्ते अनिल सुवर्णा आणि अरबाज कुरेशी गेल्या पाच वर्षांपासून गणेशोत्सवाच्या माध्यमातून गरजू नागरिक आणि विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात गरजू कुटुंबांना मोफत धान्याच्या किटचे वाटप केले जाते. तसेच आर्थिक अडचणीतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या आणि अन्य शैक्षणिक साहित्य दिले जाते. उत्सवाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो गरजूंच्या चेहऱ्यावर फुलविण्याचा प्रयत्न या दोन्ही तरुणांकडून केला जात आहे. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांना दैनंदिन गरजेच्या वस्तू उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्याची मदत मिळत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाला सामाजिक सेवेची जोड देत या तरुणांनी परिसरात माणुसकीचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानने मदत नाकारली! सौदीने थेट इस्रायलकडे मागितला गुप्तचर यंत्रणेचा सपोर्ट; हुती बंडखोरांचा उद्रेक

Manchar News : नातवाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच आजीनेही सोडले प्राण; खानदेशी कुटुंबावर दुहेरी दुःखाचा आघात

Latest Marathi News Update : गणपती दर्शनासाठी चंद्रकांत पाटील यांचा रिक्षाने प्रवास

Pune News : मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्यात कार घालण्याचा प्रयत्न; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

Kannad News : शेतकऱ्यांमध्ये संभ्रम! कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीत २,५०५ शेतकरी पात्र

SCROLL FOR NEXT