मुंबई

परवाना नूतनीकरणाकडे आस्थापनांची पाठ

CD

राहुल क्षीरसागर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : एकीकडे ठाणे पालिकेची आर्थिक स्थिती अद्याप सुधारलेली नाही. तिला उभारी देण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. दुसरीकडे पालिकेच्या परवाना विभागाकडून नूतनीकरण न केलेल्या आस्थापनांना नोटिसा बजावूनदेखील प्रतिसाद मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मागील १८ महिन्यांत तब्बल एक हजार १८२ आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यापैकी अवघ्या ४३४ आस्थापनांनी परवाना नूतनीकरण केले आहे. त्यामुळे नोटिसा बजावूनही नियमांचे पालन व आस्थापनांचे परवाना नूतनीकरण न करणाऱ्यांवर पालिका काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाणे पालिका क्षेत्रात हजारो दुकाने आणि आस्थापना परवान्याविना व्यवसाय करीत असल्याचा संशय प्रशासनाने व्यक्त केला आहे. सध्याच्या घडीला ठाण पालिकेकडे चार हजार ४२० आस्थापनांची नोंद असली तरी प्रत्यक्षात आस्थापनांची संख्या सुमारे ३० ते ४० हजारांच्या घरात पोहोचली असावी, असा अंदाज आहे. त्यामुळे विनापरवाना व्यवसाय थाटणाऱ्या आस्थापनांचा शोध घेण्यासाठी ठाणे पालिकेच्या माध्यमातून आस्थापनांची नोंदणी करण्यासाठी त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्वेक्षणातून विनापरवाना आस्थापनांचा शोध घेऊन त्यांचे नवीन परवाने काढणे तसेच ज्यांनी नूतनीकरण केले नाही अशा आस्थापनांचे नूतनीकरण करून घेण्यात येणार आहे. या माध्यमातून पालिकेच्या परवाना शुल्काच्या उत्पन्नात दरवर्षी चार ते पाच कोटींची वाढ होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

दुसरीकडे परवाना विभागाच्या आकडेवारीनुसार, १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ५३१ आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यापैकी ३१३ आस्थापनांनी परवाना नूतनीकरण केले, मात्र २१८ आस्थापनांनी अद्याप नूतनीकरण केलेले नाही. या कालावधीत परवाना शुल्कापोटी ९२ लाख ७४ हजारांची वसुली करण्यात आली. त्यामुळे नोटिसा बजावूनही परवाना प्रक्रियेचा पाठपुरावा कितपत प्रभावीपणे केला जातो, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पाच महिन्यांत आस्थापनांना ६५१ नोटिसा
चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल ते ३१ ऑगस्ट या कालावधीत परवाना विभागाने ६५१ आस्थापनांना नोटिसा बजावल्या. त्यापैकी अवघ्या १२१ आस्थापनांना परवाना देण्यात आला आहे. या कालावधीत २२ लाख ४५ हजार ५३० रुपयांची वसुली झाली आहे.

नोंदणीअभावी महसुलावर परिणाम
शहरातील आस्थापनांची अचूक संख्या, परवानाधारक व्यवसायांची नोंद आणि विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांचा शोध या तीनही बाबी परवाना विभागाच्या कार्यक्षमतेशी संबंधित आहेत. हजारो आस्थापना नोंदणीबाहेर असल्याचा संशय व्यक्त होत असेल, तर त्यामागील कारणे शोधणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT