गणरायाच्या जयघोषाने दुमदुमला महाराष्ट्र!
सोसायट्यांमध्ये ‘बिर्ला ओपस बाप्पाचा मान’ उपक्रमाची धूम
मुंबई, ता. १५ : गणेशोत्सव हा प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, उत्साह आणि आपुलकी घेऊन येणारा सण आहे. बाप्पाचं आगमन, आरती, मोदक, सजावट, कुटुंबीयांसोबतचे क्षण आणि बाप्पाच्या दर्शनातून मिळणारं समाधान, या सगळ्यांमधून प्रत्येकाच्या मनात या सणाच्या अनेक खास आठवणी जपलेल्या असतात. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभरात सध्या भक्ती आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. लाडक्या गणेशाच्या आगमनाचा महाराष्ट्रातील घराघरांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये तोच अथांग उत्साह आणि भक्तिमय चैतन्य ओसंडून वाहत आहे. याच मंगलमय वातावरणात आणि सोसायट्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘बिर्ला ओपस पेंट्स’तर्फे आयोजित ‘बिर्ला ओपस बाप्पाचा मान’ या विशेष गणेशोत्सव सजावट उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
राज्यातील तब्बल ५०० हून अधिक सोसायट्यांनी या अनोख्या उपक्रमात उत्साहात सहभाग नोंदवला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि अमरावती या प्रमुख नऊ शहरांमधील सोसायट्यांमध्ये गणेशोत्सवाचा हा जल्लोष सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. प्रत्येक सोसायटीने आपल्या कल्पकतेची आणि सृजनशीलतेची चुणूक दाखवत अप्रतिम संकल्पना साकारल्या आहेत. कुठे पारंपरिक वाडे, ऐसपैस किल्ले आणि मंदिरांच्या देखण्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत, तर कुठे ग्रामीण जीवन, निसर्गसंवर्धन, जलसंधारण, स्वच्छता आणि सामाजिक ऐक्याचे संदेश देणारे प्रबोधनपर देखावे सादर केले गेले आहेत.
महिलांचे पारंपरिक वेशभूषेत औक्षण, चिमुकल्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, ढोल-ताशांचा गजर आणि सायंकाळची सामूहिक आरती यामुळे उत्सवातील चैतन्य शिगेला पोहोचले आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या उत्सवात पर्यावरणपूरकतेवर विशेष भर देण्यात आला आहे. प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे टाळून कागद, कापड, बांबू, माती आणि पुनर्वापरयोग्य साहित्याचा वापर करून साकारलेली सजावट डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरत आहे.
--------
परीक्षक करणार प्रत्यक्ष पाहणी
उपक्रमासाठी नियुक्त करण्यात आलेले तज्ज्ञ परीक्षक आणि ज्युरी सदस्य निवडक सहभागी सोसायटीला प्रत्यक्ष भेट देत आहेत. मूर्तीची संकल्पना, आरास, रंगसंगती, रोषणाई, पर्यावरणपूरकतेचा अवलंब, सामाजिक संदेश आणि एकूणच सादरीकरण या काटेकोर निकषांवर परीक्षण केले जात असून, लवकरच शहरांमधील विजेत्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत.
--------
पुरस्कारांच्या तीन श्रेणी
सर्वाधिक वैविध्यपूर्ण गणेशमूर्ती
सर्वोत्कृष्ट पर्यावरणपूरक सजावट
सर्वोत्कृष्ट ‘बिर्ला ओपस बाप्पांचं घर’
--------
विजेत्यांना मिळणार मराठी कलाकारांची भेट!
उत्सवाच्या येत्या आठवड्यात ‘बिर्ला ओपस बाप्पाचा मान’ उपक्रमांतर्गत विजयी होणाऱ्या सोसायट्यांच्या बाप्पाच्या दरबारात चक्क आपल्या लाडक्या आणि सुप्रसिद्ध मराठी कलाकारांची पावले पडणार आहेत. हा आनंदाचा आणि संस्मरणीय सोहळा अनुभवण्याची सुवर्णसंधी सोसायट्यांसाठी उपलब्ध झाली आहे!
--------
‘असा’ नोंदवा सहभाग
तुम्ही ज्या श्रेणीत सहभाग घेतला आहे, त्या श्रेणीचे नाव, तुमचे शहर, सोसायटीचे नाव आणि सजावटीचे छायाचित्र खालील क्रमांकावर पाठवा. (नियम व अटी लागू) संपर्क क्रमांक: +९१ ९१३७० ०२३५२
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.