मुंबई

कलेचा अधिपती जास्वंदीच्या पानावर!

CD

वसई, ता. १५ (बातमीदार) : वसई-विरार शहरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना ग्रामीण भागातही पारंपरिक वातावरणात गणरायाच्या आगमनाचा सोहळा रंगला आहे. याच भक्तिमय वातावरणाला कलात्मकतेची जोड देत विरार भाताणे येथील चित्रकार कौशिक जाधव यांनी अनोखा कलाप्रयोग साकारला आहे. जास्वंदीच्या आठ पानांवर त्यांनी कलेचा अधिपती गणरायाचे देखणे रूप रेखाटले आहे.

गणरायाला जास्वंदीचे फूल प्रिय मानले जाते. त्यामुळे उत्सवाच्या काळात या फुलांना विशेष मागणी असते. याच जास्वंदीच्या पानांना कलाकृतीचे माध्यम बनवत जाधव यांनी आपल्या कल्पकतेचा आणि चित्रकलेतील कौशल्याचा सुरेख आविष्कार घडवला. प्रत्येक पानावर एका गणेशरूपाची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करण्यात आली असून, त्यासाठी वॉटर कलरचा वापर करण्यात आला आहे.

आकाराने अतिशय लहान आणि नाजूक असलेल्या पानांवर गणपतीचे भाव, मुद्रा, सोंड, मुकुट तसेच विविध बारकावे अचूकपणे टिपणे हे मोठे आव्हान होते. मात्र, आपल्या कुशल हातोटीने जाधव यांनी हे आव्हान सहज पेलत अवघ्या एका तासात संपूर्ण कलाकृती पूर्ण केली.

गणेशभक्ती आणि चित्रकलेचा सुंदर संगम या कलाकृतीतून साकारला आहे. सणासुदीला चित्र रेखाटण्याचा प्रयत्न करीत असतो.
- कौशिक जाधव, चित्रकार, विरार

कलाकृतीने वेधले गणेशभक्तांचे लक्ष
निसर्गातील साध्या पानाला कलात्मक रूप देत त्यावर अष्टविनायकांचे दर्शन घडवण्याचा हा प्रयोग सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे. भक्ती, निसर्ग आणि सर्जनशीलता यांचा सुंदर संगम असलेल्या या कलाकृतीमुळे गणेशभक्तांसह कलाप्रेमींचेही लक्ष वेधले जात आहे.

वसई : चित्रकार काैशिक जाधव यांनी जास्वंदीच्या पानावर गणराया साकारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT