मुंबई

दीड दिवसांच्या गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप

CD

दीड दिवसाच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप
अलिबाग, ता. १५ (वार्ताहर) ः गणेशोत्सवाची सुरुवात सोमवारी (ता. १४) जल्लोषात झाल्यानंतर मंगळवारी (ता. १५) दीड दिवसाच्या गणरायाला जिल्ह्यात भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. जिल्ह्यात दीड दिवसाच्या २६ हजार १६९ खासगी (घरगुती) तर १३ सार्वजनिक अशा एकूण २६ हजार १८२ गणेशमूर्तींचे विसर्जन शांततेत पार पडले.
जिल्ह्यात सोमवारी गणेशोत्सवाला धूमधडाक्यात सुरुवात झाली. त्यानंतर दीड दिवस गणरायाचा यथोचित पाहुणचार केल्यानंतर परंपरेनुसार टाळ, मृदंगाच्या गजरात विधीवत विसर्जन करण्यात आले. समुद्रकिनारे, नदी, तलाव, कृत्रिम तलाव तसेच घरच्या घरी बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. भक्त गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडले होते. मिरवणुकीत कोणी भजने गाऊन चांगलीच रंगत वाढवली. ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष सर्वत्र निनादत होता. त्यामुळे वातावरण चांगलेच भक्तिमय झाले होते.
अलिबाग शहरासह ग्रामीण भागामध्ये भक्तांच्या उत्साहाला चांगलेच उधाण आले होते. विसर्जनसाठी मोठ्या संख्याने समुद्रकिनारी, तलाव, नदी या ठिकाणी गर्दी झाली होती. विसर्जनाच्या ठिकाणी पालिकेने मदत केंद्र सुरू केले होते. ध्वनिक्षेपकावरून सातत्याने सूचनांचे पालन करण्याचे आवाहन भक्तांना करण्यात येत होते. प्रशासनासह विविध सामाजिक संस्थांनी निर्माल्य गोळा करण्यासाठी कलश ठेवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानने मदत नाकारली! सौदीने थेट इस्रायलकडे मागितला गुप्तचर यंत्रणेचा सपोर्ट; हुती बंडखोरांचा उद्रेक

Manchar News : नातवाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच आजीनेही सोडले प्राण; खानदेशी कुटुंबावर दुहेरी दुःखाचा आघात

Latest Marathi News Update : औसा तहसील कार्यालयावर महिलांचा मोर्चा; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्यात कार घालण्याचा प्रयत्न; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

Kannad News : शेतकऱ्यांमध्ये संभ्रम! कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीत २,५०५ शेतकरी पात्र

SCROLL FOR NEXT