मुंबई

कोरतड पाडवीपाडा येथे मुंडा वाचनालयाचे उद्घा‌टन

CD

जव्हार, ता. १५ (बातमीदार) : आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावे, या उद्देशाने कोरतड पाडवीपाडा येथे डॉ. जयपालसिंह मुंडा वाचनालयाचे उद्‍घाटन मंगळवारी (ता. १५) करण्यात आले. गावातील विद्यार्थी व युवकांच्या ज्ञानविकासासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले.

गावात वाचनालय सुरू करण्याची संकल्पना दिलीप पाडवी आणि राजेश पाडवी यांनी मांडली. ग्रामस्थांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत प्रत्यक्षात आणले. वाचनालयामुळे विद्यार्थ्यांना पुस्तके, संदर्भ साहित्य आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक साधने उपलब्ध होणार आहेत.

याप्रसंगी कोरतड ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच संदीप माळी, पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलीप पाडवी, डॉ. कुणाल दळवी, ज्येष्ठ शिक्षक पुंडलिक पाडवी, नारायण भोये, धनंजय दळवी तसेच दत्तू गोंडो यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाईल आणि डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचनाची सवय जोपासावी, यासाठी वाचनालय महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. गावातील ज्येष्ठ नागरिक व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित वाचन करण्याचे आवाहन केले.

जव्हार : कोरतड पाडवीपाडा येथे मुंडा वाचनालयाचे उद्‍घाटन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानने मदत नाकारली! सौदीने थेट इस्रायलकडे मागितला गुप्तचर यंत्रणेचा सपोर्ट; हुती बंडखोरांचा उद्रेक

Manchar News : नातवाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच आजीनेही सोडले प्राण; खानदेशी कुटुंबावर दुहेरी दुःखाचा आघात

Latest Marathi News Update : गणपती दर्शनासाठी चंद्रकांत पाटील यांचा रिक्षाने प्रवास

Pune News : मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्यात कार घालण्याचा प्रयत्न; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

Kannad News : शेतकऱ्यांमध्ये संभ्रम! कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीत २,५०५ शेतकरी पात्र

SCROLL FOR NEXT